Madha Loksabha: माढ्यात मोठ्या घडामोडी! धैर्यशील मोहिते पाटलांनी साथ सोडली; पण रणजितसिंह मोहिते भाजपमध्येच

Madha Loksabha Constituency: धैर्यशिल मोहिते पाटील यांच्यासोबत भाजपचे विधानसभेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजप सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्येच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Madha Loksabha Constituency:
Madha Loksabha Constituency: Saamtv

अक्षय बडवे, पुणे|ता. १४ एप्रिल २०२४

माढा लोकसभा मतदार संघात आज मोठ्या घडामोडी घडणार आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीनंतर नाराज असलेले अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह पुतणे धैर्यशिल मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. धैर्यशिल मोहिते पाटील यांच्यासोबत भाजपचे विधानसभेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजप सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्येच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच..

समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह संपूर्ण मोहिते कुटुंब आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. मात्र सध्या भाजपचे विधानपरिषदेचे आमदार असलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे आमदारकीचा राजीनामा देणार नसून ते भाजपमध्येच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

६ तालुक्याचे नेते एकत्र येणार...

आज अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे भोजनासाठी येणार आहेत. यावेळी शेकापचे अनिकेत देशमुख, फलटणचे निंबाळकर, करमाळ्याचे नारायण आबा यांच्यासह ६ तालुक्यांचे प्रमुख नेते येणार असल्याची माहिती जयसिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे.

Madha Loksabha Constituency:
BR Ambedkar Jayanti 2024 : फटाक्यांच्या आतिषबाजीने भीम जयंतीचा जल्लोष; देशभरात उत्साहाचं वातावरण

ईडीला घाबरत नाही...

"धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांची उमेदवारी म्हणजे कार्यकर्त्यांची उमेदवारी. ईडी ला आम्ही भिण्याचे कारण येत नाही. आम्ही जर राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला नसता तर गैरसमज झाला असता की दादा ईडीला घाबरले. त्यामुळे ईडीला न घाबरता आम्ही प्रवेश करतोय, आमच्याकडे तुतारी खूप चालते. माळशिरसमधून १ लाख ३० हजाराने मताधिक्य नक्की मिळेल," असा विश्वासही जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.

Madha Loksabha Constituency:
Explainer: उद्धव ठाकरे गट आणि भाजपचा ग्राऊंडवर थेट सामना कमी? नेमकं कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com