Loksabha Election: CM शिंदेंची मोठी खेळी! उद्धव ठाकरेंचे खास रविंद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Ravindra Waikar Candidate From Mumbai North West: शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईमधून उमेदवारी देण्यात आली आहे. ट्वीटरवरुन याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
Ravindra Waikar
Ravindra Waikar Saam Digital

मुंबई|ता. ३० एप्रिल २०२४

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदेंकडून मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेवर उद्धव ठाकरे यांचे खास आणि नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले जोगेश्वरीचे आमदार रविंद्र वायकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. रविंद्र वायकर यांच्यासमोर गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव शिवसेना ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांचे आव्हान असेल.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांच्याविरोधात कोण आव्हान देणार? याबाबत संभ्रम कायम होता. अखेर आज महायुतीकडून अमोल किर्तीकरांविरोधात रविंद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अधिकृत उमेदवार म्हणून श्री रवींद्र वायकर यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामुळे रविंद्र वायकर हे ईडीच्या रडारवर होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच रविंद्र वायकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. वायकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार, याबाबत चर्चाही सुरू होत्या. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Ravindra Waikar
Kolhapur News: कळंबा कारागृहात तब्बल ७५ कैद्यांकडे मोबाइल सापडले; तुरुंग अधिकाऱ्यांसह ११ पोलीस निलंबित

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या ठाण्यातून लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. ठाण्यातून एकनाथ शिंदेंचे विश्वासू नरेश म्हस्के तसेच मिनाक्षी शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. यापैकी नरेश म्हस्के यांचे नाव आघाडीवर असून येत्या दोन दिवसात त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Ravindra Waikar
Buldana Water Storage : बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; जलाशयात फक्त 11. 62 टक्के पाणीसाठा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com