Malegaon News: साडेतीन तासांत एकही गावकरी मतदान केंद्राकडे फिरकला नाही, मालेगावमधील मेव्हणे गावात नेमकं काय झालं?

Dindori Lok Sabha Constituency: दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील एका गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. या गावातील एकही व्यक्ती सकाळपासून मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आली नाही. वेगवेगळ्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे या गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
Malegaon News: मालेगावमधील मेव्हणे गावाचा मतदानावर बहिष्कार, साडेतीन तासांत  एकही गावकरी मतदान केंद्राकडे फिरकला नाही
Dindori Lok Sabha ConstituencySaam Tv

अजय सोनवणे, मनमाड

नाशिकमधील (Nashik) दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये (Dindori Loksabha Election) आज मतदान होत आहे. नाशिकमधील सर्वच ठिकाणी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली. पण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील एका गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. या गावातील एकही व्यक्ती सकाळपासून मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आली नाही. वेगवेगळ्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे या गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येणारे मालेगाव तालुक्यातील मेव्हणे गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. सकाळपासून एकही मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेला नाही. सकाळी 7 वाजल्या पासून 3 तास झाले मतदान करण्यासाठी कोणी आलेले नाही. मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी आणि अधिकार मतदारांची वाट बघत बसले आहेत.

Malegaon News: मालेगावमधील मेव्हणे गावाचा मतदानावर बहिष्कार, साडेतीन तासांत  एकही गावकरी मतदान केंद्राकडे फिरकला नाही
Loksabha Election: आठ वेळा मतदान करणारा तरुण अटकेत, बुथवरील सर्व सदस्यांचे निलंबन; पुन्हा मतदान घेण्याचे आदेश

मालेगाव तालुक्यातील मेव्हणे गावात पाण्याची समस्या, गावाचा विकास, दुष्काळी परिस्थिती आहे. तसेच गावकऱ्यांना अवकाळीचे अनुदान मिळाले नाही. काही दिवसांपूर्वी मेव्हणे गावाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे टँकर वाढून मिळावे, तसेच आमच्या समस्या सोडवाव्यात असे निवेदन गावकऱ्यांनी प्रशासनाला दिले होते. मात्र त्याची कोणतीही दखल प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी न घेतल्याने अखेर नाईलाजास्तव आम्हाला मतदानावर बहिष्कार टाकण्याची वेळ आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले

Malegaon News: मालेगावमधील मेव्हणे गावाचा मतदानावर बहिष्कार, साडेतीन तासांत  एकही गावकरी मतदान केंद्राकडे फिरकला नाही
Loksabha Election 2024: अक्षय कुमार, जान्हवी कपूरसोबत अनेक सेलिब्रिंटीनी केलं मतदान, चाहत्यांनाही केलं आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com