Loksabha Election: मोठी बातमी! काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडेंचे ६ वर्षांसाठी निलंबन

Maharashtra Loksabha Election: बाजीराव खाडे यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंबंधीचे पत्रक काढत निलंबनाचे आदेश दिले आहेत.
Maharashtra Loksabha Election:
Maharashtra Loksabha Election:Saamtv

सुनिल काळे, मुंबई: ता. २४ एप्रिल २०२४

काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी करत कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरीनंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून बाजीराव खाडे यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंबंधीचे पत्रक काढत निलंबनाचे आदेश दिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शाहू महाराज हे काँग्रेसच्या हाताचा पंजा चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. मात्र महाराजांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याचे समोर आले होते. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

सामान्य कार्यकर्त्यांनी किती दिवस काम करत राहायचे. पक्षातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरलो असल्याचे बाजीराव खाडे यांनी म्हटले होते. आता या बंडखोरीची पश्रश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून खाडे यांचे ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

Maharashtra Loksabha Election:
Maharashtra Election: हिशेब चुकता केल्याशिवाय राहणार नाही; शिवसेना पळवल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान

विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार का?

दरम्यान, कोल्हापूरप्रमाणे सांगली लोकसभेमध्येही काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतरही विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. विशाल पाटील यांच्यावर कारवाईसंबंधी उद्या काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Loksabha Election:
Nashik Onion Market: मोठी बातमी! नाशिकमधील कांदा लिलाव पुन्हा बंद; शेतकरी अडचणीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com