Lok Sabha Election 2024 Results: लोकसभेची मतमोजणी सुरु, तासाभरातच एनडीए शतक पार, इंडिया आघाडीच्या जागांमध्येही वाढ

Lok Sabha Election Results 2024 Live Update: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून प्रभिक कलमध्ये एनडीए आघाडी घेताना दिसत आहे.
लोकसभेची मतमोजणी सुरु, तासाभरातच एनडीए शतक पार, इंडिया आघाडीच्या जागांमध्येही वाढ
Lok Sabha Election 2024 ResultsSaam Tv

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून प्रारंभिक कल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये पहिल्या तासातच एनडीएने मोठी आघाडी घेतल्याचं दिसत आहे. तर इंडिया आघाडीच्या जागांमध्येही वाढ होताना दिसत आहे.

सुरुवातीला हाती आलेय कलनुसार, एनडीए 138 जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी 83 जागांवर आघाडीवर दिसत आहे. मात्र हे प्रारंभिक कल असून हे प्रत्येक तासात बदलू शकतात, संपूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी काही तासांचा वेळ लागू शकतो.

लोकसभेची मतमोजणी सुरु, तासाभरातच एनडीए शतक पार, इंडिया आघाडीच्या जागांमध्येही वाढ
Mumbai Election Results 2024: मुंबई ठाकरेंची की शिंदेंची? महापालिकेचे चित्र आजच होणार स्पष्ट; 6 जागांचे निकाल ठरवणार

उत्तर प्रदेशात कोण आगाडीवर?

उत्तर प्रदेशात देशातील सर्वाधिक 80 लोकसभेच्या जागा आहे. यामध्ये भाजप 38, काँग्रेस 5 , समाजवादी पक्ष 17 आणि अन्य 5 जागांवर आघाडीवर आहे.

राज्यात महायुती आणि मविआमध्ये काटे की टक्कर

राज्याच्या प्रारंभिक कलबद्दल बोलायचं झालं तर, महायुती 24 तर महाविकास आघाडी 22 जागांवर आघाडीवर आहे, यामध्ये भाजप 21, ठाकरे गट 14, काँग्रेस, 5, शिंदे गट 2, शरद पवार गट 3 आणि अजित पवार गट 1 जागेवर आघाडीवर आहे.

लोकसभेची मतमोजणी सुरु, तासाभरातच एनडीए शतक पार, इंडिया आघाडीच्या जागांमध्येही वाढ
Jayant Patil News: 'सतर्क रहा; मतमोजणीत फेरफार केला जाण्याची शक्यता', जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना पत्र!

दोन्ही जागांवर राहुल गांधी पुढे

काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

मंडी मतदारसंघातून कंगना रणौत 2000 मतांनी आघाडीवर

सुरुवातीच्या कलमध्ये, हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रणौत 2000 मतांनी आघाडीवर आहे. कंगनाची स्पर्धा काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंग यांच्याशी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com