Lok Sabha Election : 'माझ्या आईच्या मंगळसूत्रांने देशासाठी बलिदान दिलं'; मंगळसूत्राच्या राजकारणावरून प्रियंका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Lok Sabha Election 2024: काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर तुमचं मंगळसूत्र आणि सोनं हिरावून घेईल, असं नरेंद्र मोदी म्हणत आहेत, मात्र माझ्या आईच्या मंगळसूत्राने देशासाठी बलिदान दिलं आहे, असं प्रत्युत्तर प्रियंका गांधी यांनी दिलं आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha Election Saam Digital

मंगळसुत्रावरून सुरू असलेल्या राजकारणावरून प्रियंका गांधी य़ांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर तुमचं मंगळसूत्र आणि सोनं हिरावून घेईल, असं नरेंद्र मोदी म्हणत आहेत, मात्र माझ्या आईच्या मंगळसूत्राने देशासाठी बलिदान दिलं आहे, असं प्रत्युत्तर प्रियंका गांधी यांनी दिलं आहे. कर्नाटमधील प्रचार सभेत त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

देशात 55 वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. तुमचे सोने आणि मंगळसूत्र कोणी हिसकावले का? इंदिरा गांधींनी युद्धात आपले सोने देशाला दिले होते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्ष लोकांकडून सोने आणि मंगळसूत्र हिसकावून घेणार असल्याचे आरोप केले जात आहेत. हा देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली, 55 वर्षे काँग्रेसची सत्ता होती, पण तुमच्याकडून सोने कोणी हिसकावले का? मंगळसूत्र कोणी हिसकावले? युद्ध झाले तेव्हा इंदिरा गांधींनी आपले सोने देशाला दिले. माझ्या आईचे मंगळसूत्र या देशासाठी अर्पण केले आहे.

Lok Sabha Election
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या सरचिटणीसांना भाजपसाठी मतं मागणं भोवलं; पक्षाकडून गंभीर दखल, केली मोठी कारवाई

नोटबंदीच्या काळात माझ्या बहिणींना त्यांचे मंगळसूत्र गहाण ठेवावे लागले, तेव्हा पंतप्रधान कुठे होते? शेतकरी आंदोलनात 600 शेतकरी शहीद झाले, तेव्हा त्यांच्या पत्नीच्या मंगळसूत्राचा विचार केला का? पंतप्रधान मोदी आज महिलांना मतांसाठी घाबरवत आहेत का? पंतप्रधानांना मंगळसूत्राचे महत्त्व कळले असते तर त्यांनी अशा अशोभनीय गोष्टी बोलल्या नसत्या, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

Lok Sabha Election
Maharashtra Politics 2024 : कोण होणार पुण्याचा खासदार?; भाजपची हॅटट्रिक की काँग्रेसचं कमबॅक?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com