D.K. Shivkumar: कार्यकर्त्याने खांद्यावर हात ठेवला.. उपमुख्यमंत्र्यांनी थेट कानाखाली लगावली; काँग्रेस नेत्याचा VIDEO व्हायरल

D. K. Shivkumar Viral Video: काँग्रेसचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी फक्त खांद्यावर हात ठेवल्याच्या रागातून पक्षाच्या कार्यकर्त्याच्याच कानाखाली मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत भाजपने जोरदार निशाणा साधला आहे.
D. K. Shivkumar Viral Video:
D. K. Shivkumar Viral Video:Saamtv

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचे धुमशान सुरू आहे. निवडणुकांमुळे अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, रॅलींचा धडाका सुरू आहे. इलेक्शनच्या काळात नेते आणि कार्यकर्ते एकदिलाने फिरताना दिसत आहेत. अशातच काँग्रेसचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी फक्त खांद्यावर हात ठेवल्याच्या रागातून पक्षाच्या कार्यकर्त्याच्याच कानाखाली मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत भाजपने जोरदार निशाणा साधला आहे.

व्हिडिओमुळे वादात..

काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार एका व्हायरल व्हिडिओमुळे चांगलेच वादात सापडले आहेत. कर्नाटकातील हावेरी येथे धारवाडमधील काँग्रेसचे लोकसभा उमेदवार विनोदा आसुती यांच्या प्रचारासाठी निवडणूक रॅली काढण्यासाठी आले होते. या रॅलीदरम्यान त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यालाच कानाखाली मारल्याचा प्रकार घडला. ज्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

रॅलीमध्ये काय घडलं?

रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी डी. के. शिवकुमार आले अन् ते गाडीतून उतरताच त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांनी गराडा घातला. याचवेळी एका हौशी कार्यकर्त्याने उत्साहाच्या भरात उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार यांच्या खांद्यावर हात ठेवला. याचाच उपमुख्यमंत्र्यांना राग आला आणि त्यांनी तिथेच त्या कार्यकर्त्याच्या कानाखाली मारली.

D. K. Shivkumar Viral Video:
Nashik Lok Sabha: ठाकरेंच्या उमेदवाराला शह देण्यासाठी CM शिंदेची मोठी खेळी; नाशिकमध्ये काहीतरी मोठं घडणार!

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओवरुन भाजपने डी. के शिवकुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्या कार्यकर्त्याची काय चूक होती? काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षासाठी का काम करावे वाटते? या सर्वांना एका परिवाराने घेरले आहे, असा घणाघात अमित मालवीय यांनी केला आहे.

D. K. Shivkumar Viral Video:
Akola Fire News : कचरा जाळल्याने चारचाकी गाड्यांना आग; दोन गाड्यांचे मोठे नुकसान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com