Raigad Lok Sabha: अजित पवारांच्या खास शिलेदारासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात; रायगडमध्ये आज महायुतीची जाहीर सभा

Mahayuti Raigad Sabha: अजित पवार यांचे खास शिलेदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. रायगडच्या पेण येथे आज महायुतीची सभा होणार आहे.
Devendra Fadnavis on Ajit Pawar Group
Devendra Fadnavis on Ajit Pawar Group Saam Tv

Raigad Lok Sabha Constituency

अजित पवार यांचे खास शिलेदार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. रायगडच्या पेण येथे तटकरेंच्या प्रचारार्थ आज शुक्रवारी देवेंद्र फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत. दुपारी १२ वाजता ही सभा होणार असून यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.

Devendra Fadnavis on Ajit Pawar Group
Breaking News: मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये तांत्रिक बिघाड; अमरावती, अकोला, वर्ध्यात मतदार ताटकळले

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सभेत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. महायुतीच्या सभेला शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत, रवींद्र चव्हाण यांच्यासह रायगडमधील महायुतीचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघ हा सध्या महायुतीच्या ताब्यात आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सुनील तटकरे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. यंदाही महायुतीने रायगडमधून सुनील तटकरे यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अनंत गीते यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

रायगडच्या जागेसाठी सुरुवातीला भारतीय जनता पक्ष आग्रही होता. या मतदारसंघातून यंदा भाजपच्या उमेदवाराने निवडणूक लढवावी, अशी इच्छा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची होती. यासाठी त्यांनी सुनील तटकरे यांच्याविरोधात जोरदार मोहिम देखील उघडली होती.

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील या जागेवर आपला दावा केला होता. मात्र, सुनील तटकरे यांनी बाजी मारत लोकसभेचं तिकीट मिळवलं. तटकरेंच्या उमेदवारीमुळे भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. हीच नाराजी दूर करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस पेण येथे जाहीर सभा घेणार आहेत.

त्यामुळे फडणवीस ही नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अगदी दोन दिवसांपूर्वी खेडमध्ये इंडिया आघाडीची सभा पार पडली होती. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या होमग्राउंड वर पार पडलेल्या या सभेत अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला तटकरे आज काय उत्तर देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Devendra Fadnavis on Ajit Pawar Group
Sharad Pawar: शरद पवारांचा प्रचारसभांचा धडाका; माढ्यात आज ३ मोठ्या सभा घेणार, मोहिते पाटलांची ताकद वाढणार!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com