महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे विरोधकांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र राजठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि विकासकामांसाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देताना, विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या व्यासपीठावरूनच कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे विधानसेभवेळी नेमकं काय मनसेची महायुतीसोबत कशी भूमिका असेल यावर आतापासूनच चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंच्या या सूचक वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्याना विचारलं असता, मुख्यमंत्र्यांनी, प्रत्येक पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण आधी लोकसभा निवडणुका होऊ देत, त्यानंतर विधानसभेचं पाहू, असं म्हटलं आहे.
आमची शिवसेना बाळासाहेबांची आहे, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. काँग्रेसप्रणित शिवसेना नाही. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांनी, सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये. तुम्ही मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी, स्वार्थासाठी, मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. धनुष्यबाण गहाण ठेवला आणि आम्हाला शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली.
कोरोनाच्या काळात ते घरी बसले होते आणि मोदीनी देशातीलच नव्हे तर जगातील लोकांना मदत केली. तेव्हा आरोप लावणारे घरी बसून कोणता शौर्य दाखवत होते. जेव्हा कोरोनामध्ये लोक मरत होते. तेव्हा हे घरी बसले होते. पंतप्रधानांनी महाराष्ट्राला बरचं काही दिलं आहे त्यांचं महाराष्ट्र वर प्रेम आहे. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचं योगदान आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून येतील अशी गॅरंटी मतदारांनी मोदींना दिली आहे. 45 जागा जिंकून मोदींचे हात बळकट करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.