Maharashtra Politics: विधानसभेच्या उपसभापती प्रचार कसा करू शकतात? ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हेंच्या प्रचारावर प्रश्नचिन्ह

Ambadas Danve On Neelam Gorhe: ठाकरे गटाने नीलम गोऱ्हे यांच्या प्रचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पीठासन अधिकारी असताना प्रचार कसा करू शकतात, असा प्रश्न विधानपरिषदेतील विरोधी नेते अंबादास दानवे विचारला आहे.
Ambadas Danve
Ambadas Danve On Neelam GorheSaam Tv
Published On

माधव सावरगावे साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर

राज्यात लोकसभेची (Lok Sabha Election) राजकीय रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राजकीय दिग्गज मैदानात उतरल्याचं दिसत आहे. शिंदे गटाच्या नेत्या आणि पीठासन अधिकारी निलम गोऱ्हे देखील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे. आता यावरून पुन्हा वातावरण (Chhatrapati Sambhajinagar Politics) तापल्याचं दिसून येत आहे.

विधानपरिषदेतील विरोधी नेते अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या प्रचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पीठासन अधिकारी असताना प्रचार कसा करू शकतात, असा प्रश्न दानवेंनी विचारला (Ambadas Danve Question On Neelam Gorhe Campaign) आहे. नीलम गोऱ्हे यांच्या 'मी प्रचार करू शकते' या वाक्यावर दानवेंचे प्रश्न दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

माध्यमांशी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले की, आपल्या लोकशाहीमध्ये पीठासन अधिकाऱ्यांची एक गरिमा असते. ती गरिमा जपण्यासाठी सर्वांनी काम करणं गरजेचं आहे. त्यामध्ये मी सुद्धा असू शकतो. सभापती, उपसभापती हे निःपक्ष असतात. कोणत्याही पक्षाचे सदस्य असले तरी ते निःपक्ष असतात आणि त्यांनी असायलाही हवं.

पीठासन अधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी (Maharashtra Politics) असते. सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांच्या हातात आहे. म्हणून कोणत्याही सभापती, उपसभापती असलेल्या व्यक्तीला राजकीय पक्षाचा प्रचार करता येत नाही. करता येत असेल, तर मग ते (Neelam Gorhe) कोणत्या नियमाने प्रचार करत आहेत? जर तो नियम असेल तर नि:पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं, असं दानवेंनी म्हटलं आहे.

Ambadas Danve
Video: जेव्हा Ambadas Danve रिपोर्टर होऊन सामसाठी चंद्रकांत खैरेंची मुलाखत घेतात! SAAM EXCLUSIVE

वरील प्रश्नावर प्रतिक्रिया देताना निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत की, एका पक्षाचे सदस्य आहे म्हणून आमदार झाले. विधान परिषद आणि विधानसभेमध्ये निष्पक्ष व्हावं म्हणून आम्ही प्रचार करू शकतो, अशी माहिती आहे. मतदार म्हणून आमची राजकीय मत (Maharashtra Election) असू शकतात. उपसभापती आहोत, तरी प्रचार करू शकतो. याबद्दल आम्ही वारंवार चौकशी केली असल्याचं निलम गोऱ्हेंनी म्हटलं आहे.

Ambadas Danve
Ambadas Danve: मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, ठाकरेंसोबतच राहणार; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com