Manoj Jarange Patil: तुम्ही हाय कितीक?...आमची संख्या किती..., जरांगे पाटील यांचा पंकजा मुंडेंवर निशाणा

Manoj Jarange Patil On Pankaja Munde: मनोज जरांगे पाटील यांच्या निशान्यावर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि मुंडे कुटुंबासह समाज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 'तुम्ही हाय कितीक? असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांची बीड जिल्ह्यातील मतदाराची संख्या सांगितली.
Manoj Jarange Patil On Pankaja Munde
Manoj Jarange Patil On Pankaja MundeSaam Tv

विनोद जिरे, बीड

बीड लोकसभा मतदारसंघातील (Beed Lok Sabha Constituency) महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगताना दिसत आहे. आता तर मनोज जरांगे पाटील यांच्या निशान्यावर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि मुंडे कुटुंबासह समाज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 'तुम्ही हाय कितीक? असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांची बीड जिल्ह्यातील मतदाराची संख्या सांगितली. महत्वाचे म्हणजे यावेळी जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आणि उदाहरण देत प्रीतम मुंडेंचं सासर देखील काढलं.

बीडच्या माजलगावमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. यावेळी त्यांनी सांगितले की, 'ती मुलगी तिथं उभा राहिली म्हणून भुजबळांच्या पोटात काय दुखायलंय. तिचं सासर आहे तिथं. त्या खासदार असताना धनगराच्या आरक्षणावर कधी बोलल्यात का? मात्र आता त्यांना धनगर लागतो. मराठा विरोधात असता तर गोपीनाथ मुंडेसाहेबांना एवढ्या मोठ्या मतांनी निवडून दिलं नसतं. यांच्या मुलीला दोनदा खासदार केलं नसतं. त्यांच्या पुतण्याला आमदार केलं नसतं.'

Manoj Jarange Patil On Pankaja Munde
Priyanka Gandhi Rally: नंदुरबारमध्ये प्रियांका गांधी आल्या, इंदिरा गांधींच्या आठवणी सांगितल्या!

जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, 'एवढं करून जर तुम्ही मराठ्यांना विरोधक समजत असाल तर मराठे कसं निवडून देतील तुम्हाला? तुम्ही हाय तरी कितीक? आम्ही सहा - साडेसहा लाख आहोत इथ एकटेच. त्यात साडेतीन लाख मुस्लिम. आम्ही जातीवादी असतो तर गोपीनाथ मुंडेसाहेबांना निवडून दिलं नसतं. दुसऱ्या जिल्ह्यातील बबनराव ढाकणे यांना निवडून दिलं नसतं, तीन वेळा केशरकाकूंना खासदार केलं नसतं, नेहमी क्षीरसागर घराण्याला मराठा समाज निवडून देतो.'

Manoj Jarange Patil On Pankaja Munde
Arvind Kejriwal News: 'योगींची हकालपट्टी, अमित शहांना पंतप्रधान करण्याचा डाव', अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत पाठिंबा नेमका कोणाला याबद्दल देखील सांगितले. ते म्हणाले की, 'आता तुम्हाला काय करायचे ते करा आपला पाठिंबा कोणालाच नाही. महाविकास आघाडीला नाही, महायुतीला नाही, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, पण असं पाडा की खाली गेल्यानंतर वर आलाच नाही पाहिजे. मतात दाखवा आता आपली ताकद.'

Manoj Jarange Patil On Pankaja Munde
Udayanraje Bhosale: निवडून दिलं नाही तर मी राजीनामा देईल, पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे जनतेसमोर नतमस्तक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com