Amravati News: हनुमानजी दणका देणार; नौटंकीवाल्यांना उखडून फेकणार.. यशोमती ठाकूर यांचा राणा दांपत्याला टोला

Maharashtra Loksabha Election: 'हनुमानजी दणका देणार व शिस्तीत राहायला शिकवणार आहे तसेच नौटंकी वाल्यांना उखडून फेकणार आहे," अशा शब्दात काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी राणा दांपत्यावर जोरदार टीका केली आहे.
Yashomati Thakur on Navneet Rana Statement
Yashomati Thakur on Navneet Rana StatementSaamtv

अमर घटारे, अमरावती|ता. २३ एप्रिल २०२४

'हनुमानजी दणका देणार व शिस्तीत राहायला शिकवणार आहे तसेच नौटंकी वाल्यांना उखडून फेकणार आहे," अशा शब्दात काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी राणा दांपत्यावर जोरदार टीका केली आहे. आज हनुमान जयंतीनिमित्त दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर निशाणा साधला.

अमरावती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार बळवंत वानखेडे यांच्याविरुद्ध महायुतीच्या नवनीत राणांमध्ये लढत होणार आहे. नवनीत राणा यांनी प्रचारसभांचा धडाका लावला असून महाविकास आघाडीवर त्या थेट हल्लाबोल करत आहेत. अशातच आज काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही राणा दांपत्यावर निशाणा साधत जोरदार पलटवार केला.

काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?

"देव आणि श्रध्दा हा आंतरिक विषय असतो. देवाचा खेळ खंडोबा करणाऱ्यांना देव नक्कीच दणका देणार व त्यांना शिस्तीत रहायला शिकवणार, असा टोला यशमती ठाकूर यांनी राणा दांपत्याला लगावला. तसेच नवनीत राणा यांचा मंडप कोसळला, त्यादिवशी शनिवार होता. देवाने संदेश दिला आहे, शनिवारच्या दिवशी वादळ आलं होत, हे वादळ नौटंकीवाल्यांना उखडून फेकणार आहे," असेही त्या यावेळी म्हणाल्या.

Yashomati Thakur on Navneet Rana Statement
Lok Sabha Election : नंदुरबार जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या ७ तक्रारी; एका तक्रारीची पोलिसात नोंद

उद्या राहुल गांधींची सभा !

दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी अमरावतीत येत आहेत. यावेळी राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडणार आहे. तसेच सोलापूर मतदार संघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठीही राहुल गांधी सभा घेणार आहेत.

Yashomati Thakur on Navneet Rana Statement
Nashik News: नाशिकमध्ये मनाई आदेश: 15 दिवस 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; नेमकं कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com