Nagar Loksabha Result: पवारांच्या पठ्ठ्याने विखेंचा बालेकिल्ला फोडला! नगरमध्ये 'तुतारी'चाच आवाज; निलेश लंके विजयी

Ahmednagar South Loksabha Constituency Election Result: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके विरुद्ध महायुतीचे सुजय विखे पाटील यांच्यामध्ये झालेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील विजयाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. अखेर या महत्वाच्या लढतीचा निकाल समोर आला आहे.
Nagar Loksabha Result: पवारांच्या पठ्ठ्याने विखेंचा बालेकिल्ला फोडला! नगरमध्ये 'तुतारी'चाच आवाज; निलेश लंके विजयी
Sujay Vikhe vs Nilesh LankeSaam TV

सुशिल थोरात| अहमदनगर, ता. ४ जून २०२४

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे अंतिम निकाल समोर येत आहेत. अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील सुजय विखेंविरुद्ध निलेश लंके या महत्वाच्या लढतीचा अंतिम निकाल हाती समोर आला आहे. नगर दक्षिणमध्ये निलेश लंके यांनी विखेंचा धुव्वा उडवत दिल्ली दरबारी थाटात एन्ट्री केली आहे.

नगर दक्षिण लोकसभेचा निकाल:

राज्यातील लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला होता. नगरमध्ये महायुतीकडून भारतीय जनत पक्षाचे उमेदवार सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यामध्ये काँटे की टक्कर झाली. या लढतीत अखेर निलेश लंके यांनी सुजय विखेंचा पराभव करत खासदारकी मिळवली आहे.

सुजय विखेविरुद्ध निलेश लंके..

नगर दक्षिणमध्ये सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार होते. त्यामुळे त्यांची उमेदवारी फिक्स होती. मात्र महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे असलेल्या या जागेवर कोण उमेदवार असणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांच्या गटातील आमदार निलेश लंके यांना पक्षात घेत तुतारीच्या चिन्हावर लोकसभेचे तिकीट जाहीर केले.

Nagar Loksabha Result: पवारांच्या पठ्ठ्याने विखेंचा बालेकिल्ला फोडला! नगरमध्ये 'तुतारी'चाच आवाज; निलेश लंके विजयी
Nashik News: विखे पाटलांची एन्ट्री, शुभांगी पाटीलही बंडखोरीच्या तयारीत; नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत रंगणार चढाओढ!

लक्षवेधी लढत!

पारनेरचे आमदार ते थेट खासदारकीचे तिकीट मिळवलेले निलेश लंके बलाढ्य सुजय विखेंसमोर आव्हान उभे करणार का? याबाबत शंका होती. मात्र निलेश लंके यांनी पहिल्यापासून आघाडी घेत विखेंसमोर मोठे आव्हान उभे केले होते. त्यामुळेच निलेश लंके जायंट किलर ठरणार की सुजय विखे बालेकिल्ला शाबूत ठेवणार? याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर या लक्षवेधी लढतीचा निकाल समोर आला असून जायंट किलर निलेश लंके यांनी विजय मिळवत नगरमध्ये आपणच किंग असल्याचे दाखवून दिले आहे.

Nagar Loksabha Result: पवारांच्या पठ्ठ्याने विखेंचा बालेकिल्ला फोडला! नगरमध्ये 'तुतारी'चाच आवाज; निलेश लंके विजयी
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे १५ दिवसांतच मोदींसोबत जातील; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचं उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com