Lok Sabha Election: सत्तेत आल्यानंतर संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात CAA रद्द करणार, काँग्रेसची मोठी घोषणा

P Chidambaram News: इंडिया आघाडी केंद्रात सरकार स्थापन करताच नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) संसदेच्या पहिल्या सत्रात रद्द करेल, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले आहेत.
P Chidambaram
P Chidambaram Saam Tv

P Chidambaram On CAA:

इंडिया आघाडी केंद्रात सरकार स्थापन करताच नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) संसदेच्या पहिल्या सत्रात रद्द करेल, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले आहेत. ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा सीएए रद्द करण्याचा मानस आहे,जाहीरनाम्यात जरी याचा उल्लेख नसला तरी आम्ही हे करणार आहोत.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सिस्ट (सीपीआय-एम) राजकारणी सतत काँग्रेसवर निशाणा साधत आहेत की, त्यांच्या जाहीरनाम्यात सीएएचा उल्लेख नाही. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना चिदंबरम असं म्हणाले.

P Chidambaram
Maharashtra Politics: जोपर्यंत मी रिंगमास्टर आहे, तोपर्यंत वाघाचा कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

चिदंबरम म्हणाले की, भाजपने आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात देशाचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यांनी संसदेत आपल्या बहुमताचा गैरवापर केला आहे. चिदंबरम म्हणाले, 'कायद्यांची एक लांबलचक यादी आहे, त्यापैकी पाच कायदे पूर्णपणे रद्द केले जातील. हे माझे वचन आहे, मी जाहीरनामा समितीचा अध्यक्ष आहे. मी त्यातील प्रत्येक शब्द लिहिला, मला माहित आहे की, यामागे हेतू काय होता. सीएएमध्ये सुधारणा होणार नाही, उलट ते रद्द केली जाईल. हे आम्ही स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसने कायद्याला विरोध केला नसल्याचा विजयन यांचा दावा चिदंबरम यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले की, तिरुअनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी संसदेत सीएए विरोधात मत व्यक्त केले होते. चिदंबरम यांनी आरोप केला की, भाजप सरकार देशातील हजारो चौरस किलोमीटर भारतीय भूमी चिनी सैन्याने बळकावल्याचे सत्य देशातील जनतेपासून लपवत आहे.

P Chidambaram
Sharad Pawar: 10 वर्षांपासून तुमचं सरकार आणि तुम्ही आम्हाला विचारता काय केलं? शरद पवार भाजपवर कडाडले

केंद्र सरकारवर निशाणा साधत चिदंबरम म्हणाले की, मोदींच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमकुवत झाले आहे. चिदंबरम म्हणाले, 'भाजपने 14 दिवसांत जाहीरनामा तयार केला, त्याचे शीर्षक जाहीरनामा नाही. त्याला मोदींची गॅरंटी असे म्हटले. भाजप हा आता राजकीय पक्ष राहिलेला नाही. तो एक पंथ बनला आहे आणि हा पंथ नरेंद्र मोदींची पूजा करतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com