Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी 49.7 कोटी पुरुष करणार मतदान, महिलांची संख्या किती?

lok Sabha Election Dates: देशात सात टप्प्यात मतदानात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानात होणार आहे.
India's women voters
India's women votersSaam Tv

Lok Sabha Election 2024:

निवडणूक आयोग शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करत आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक हा सण, देशाचा अभिमान असल्याचे सांगितले. यावेळी ९६.८ कोटी मतदार मतदान करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिल. म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुमारे ९७ कोटी लोक मतदान करतील. तसेच देशात सात टप्प्यात मतदानात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानात होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत सुमारे १.८ कोटी मतदार आहेत जे पहिल्यांदाच कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार आहेत. याशिवाय २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या १९.४७ कोटी आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, ज्या उमेदवारांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत त्यांना तीनदा ही माहिती देणाऱ्या जाहिराती द्याव्या लागतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

India's women voters
Loksabha Election 2024: लोकसभेच्या रणधुमाळीला सुरूवात! महाराष्ट्रात मतदान अन् निकालाचा गुलाल कधी? वाचा

महिला मतदारांची संख्या किती?

एकूण मतदारांमध्ये ४९.७ कोटी पुरुष, ४७.१ कोटी महिला आणि ४८ हजार ट्रान्सजेंडर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, देशात १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, "आमच्या मतदार यादीत ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ८२ लाख आणि १०० वर्षांवरील २.१८ लाख मतदारांचा समावेश आहे." (Latest Marathi News)

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, ''१७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ जून २०२४ मध्ये संपणार आहे. जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुका होणार आहेत.''

India's women voters
Lok Sabha Election 2024 Dates : कार्यक्रम ठरला! देशात ७ टप्प्यांत लोकसभा निवडणुका; १९ एप्रिलला मतदान, ४ जूनला मतमोजणी

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मुख्य लढत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट, आम आदमी पक्ष, सपा या विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी यांच्यात होणार आहे. भाजपच्या ३७० जागा आणि एनडीएच्या ४०० जागा जिंकण्याचा दावा पंतप्रधान मोदी करत असताना विरोधी पक्षांनी त्यांच्या विजयाचा दावा केला आहे. आतापर्यंत भाजपने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या असून त्यामध्ये एकूण २६७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

काँग्रेसनेही आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत ३९ तर दुसऱ्या यादीत ४३ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. २०१९ मध्ये एप्रिल-मे महिन्यात शेवटच्या लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. एकूण सात टप्प्यातील मतदानानंतर २३ मे रोजी मतमोजणी झाली. भाजपने सलग दुसऱ्यांदा एकहाती बहुमत मिळवले आणि ३०3 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com