Lok Sabha Election: २८ लाख महिलांना घेता आलं नाही पतीचं नाव; निवडणूक आयोगाने मतदार हटवली नावे

First Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये महिला मतदार मोठी भूमिका बजावणार आहेत. पहिला लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांची यादी करताना निवडणूक आयोगाला अनेक अडचणी आल्या होत्या.
First Lok Sabha Election
First Lok Sabha ElectionYandex
Published On

First Lok Sabha Election Woman voters Names :

लोकसभा निडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशातील सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून यात विजय मिळवण्यासाठी मतदाराचं मते आवश्यक आहेत. दरम्यान भारतात जेव्हा पहिल्यांदा लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी निवडणूक आयोगासमोर एक विचित्र आव्हान उभं राहिलं होतं. अनेक राज्यातील महिलांनी मतदार नोंदणी घरातील पुरुषांच्या नावाने केली होती. यामुळे निवडणूक आयोगाला तब्बल २८ लाख महिला उमेदवारांची नावे यादीतून हटवण्यात आली होती. (Latest News)

लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये महिला मतदार मोठी भूमिका बजावणार आहेत. पहिला लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांची यादी करताना निवडणूक आयोगाला अनेक अडचणी आल्या होत्या. काही राज्यातील अनेक महिला मतदारांनी आपल्या नावाऐवजी घरातील पुरूष सदस्यांच्या नावावर मतदार यादीत नोंदणी केली होती.

या विषयावर जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. १९५१-५२ च्या निवडणुकीसाठी अशा महिला मतदारांना त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या म्हणजे १९५५ मध्ये प्रकाशित झालेल्या अधिकृत अहवालानुसार देशातील अंदाजे ८ कोटी महिला मतदारांपैकी सुमारे २८ लाख महिला त्यांची योग्य नावे उघड करण्यात अयशस्वी ठरल्या होत्या. माहिती मतदार यादीतून काढून टाकावी लागली होती.

बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, विंध्य प्रदेश या राज्यांमध्ये अशी प्रकरणे समोर आली होती. १९५० मध्ये प्रजासत्ताक म्हणून उदयास आलेल्या भारतात एका दिवसा आधी आलेल्या निवडणूक आयोगाने १७ निवडणुका घेतल्या. पहिल्या निवडणुकीच्यावेळी निवडणूक आयोगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.१९५१-५२ च्या लोकसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या अहवालात, असे लिहिले होते, मतदारांची यादी करताना अनेक महिलांनी त्याच्या नावाऐवजी पुरूषांच्या नावाने नोंदणी केली होती. अनेक महिला आपलं योग्य नाव सांगण्यास लाचत होत्या.

First Lok Sabha Election
Lok Sabha Elections 2024: मतदारांना मिळेल उमेदवारावरील गुन्ह्यांची माहिती; निवडणूक आयोगाकडून KYC लॉन्च

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com