World Poetry Day 2022 | तुम्हीही कवी होऊ शकता! या 'पाच' टिप्स फॉलो करा...

How To Write Poem In Marathi: भावना व्यक्त करणं आणि त्या भावना वाक्यांच्या स्वरुपात कागदावर लिहून ठेवाव्यात. मनातल्या भावना काव्यात व्यक्त करणे म्हणजेच कविता होय.
World Poetry Day 2022: You too can become a poet! Follow these 'five' tips...
World Poetry Day 2022: You too can become a poet! Follow these 'five' tips...Saam Tv
Published On

मुंबई: कवितेचं रसग्रहण करा असा प्रश्न आपण शाळेत असताना मराठीच्या पेपरला नक्की यायचा. आता कवितेचं रसग्रहण तेव्हाच करता येतं जेव्हा मुळात आपल्याला कवितेतला भावार्थ कळतो आणि कवितेला (Poem) भावार्थ कळला की आपल्यालाही कविता करता येते, कवितेचं रसग्रहण (The appreciation of poetry) करता येतं. कविता करण्यासाठी फक्त सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नितळ भावना. भावना खरी असली की त्याला शब्दांची जोड, शब्दांना यमक-गमकाची साथ आणि त्याला अलंकारांची फोडणी दिली की रसरशीत आणि कविता तयार होते. तर आज जागतिक कविता दिनानिमित्त (World Poetry Day 2022) कविता कशी लिहावी याबद्दल आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. (You too can become a poet! Follow these 'five' tips ...)

हे देखील पहा -

कविता रचण्यासाठी पाच महत्वाच्या टिप्स (Five Tips Of Writing Poems):

१) भावना व्यक्त करा (Express Your Feelings)

माणसाला कविता सुचण्यासाठी मनात एखादा विचार आणि भावना असणं गरजेचं आहे. एखादी अशी गोष्ट की जी तुमच्या हृदयाला आणि मेंदूला स्पर्श करते, तुम्हाला सतत त्याबद्दल बोलावसं वाटत असेल तर त्याच भावनेला तुम्ही कागदावर उमटवू शकता. त्यामुळे भावना व्यक्त करणं आणि त्या भावना वाक्यांच्या स्वरुपात कागदावर लिहून ठेवाव्यात. मनातल्या भावना काव्यात व्यक्त करणे म्हणजेच कविता होय.

२) भावनेचं शब्दांत रुपांतरण करा (Transformation of Emotion into Words)

भावना आणि विचार स्पष्ट झाले की, कविता कुणावर करायची, का करायची हे आपल्याला माहित असायला हवं. आपल्या भावनांना आता योग्य शब्द निवडावा. तीन-चार शब्दांना एकच पर्यायी शब्द द्यावा. कवितेत शद्ब अगदी तोलून - मापून वापरावेत. शब्दांना भावार्थ द्यावा त्यांना अलंकाराची जोड द्यावी.

३) यमक-गमक पहा (Write in Rhyme)

कवितेमध्ये जर यमक, गमक जुळत नसेल तर कविता अपूर्ण असते! तसेच त्यात एखादा अलंकार नसेल तर तिला लय येत नाही! मात्र कवितेत शब्दरचना करताना प्रत्येक ओळींंमध्ये यमक जुळणं गरजेचं नाही. त्यामुळे यमक जुळवताना नीट विचार करावा. उगाच जुळतय म्हणून काहीही जुळवू नये. अर्थहीन यमक जुळलं की कविता भरकटत जाते.

४) स्वरांची साथ द्या(Accompanied by Tones)

कविता सुंदर आणि छान लिहिली की, तिचं सादरीकरणही तेवढचं प्रभावी व्हायला हव. कविता सादर करण्याची विशिष्ट पद्धत असते. कवितेला चाल आणि स्वरांची साथ दिली की कविता ऐकणाऱ्याच्या थेट हृद्यात प्रवेश करते. त्यामुळे कविता लिहिल्यावर कविता कवितेला स्वरांंची साथ द्यावी.

५) व्याकरण आणि शुद्धलेखन तपासा (Check Grammar and Spelling)

कविता हे भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम असतं. वरील चार मुद्द्यांनी तुम्ही कविता नक्कीच करु शकता. पण, सर्वात शेवटी कवितेतील व्याकरण आणि शुद्धलेखनही तपासायला हवं. व्याकरण आणि शुद्धलेखनात तफावत झाली की अर्थाचा अन्वयार्थ होऊ शकतो. त्यामुळे कवितेचं व्याकरण आणि शुद्धलेखन व्यवस्थित करुन कविता पुर्णत्वास न्यावी.

जागतिक कविता दिनाबद्दल थोडक्यात (What is World poetry day):

दरवर्षी २१ मार्च रोजी जागतिक कविता दिन साजरा केला जातो. साहित्य संघटना, काव्यप्रेमी, पत्रकार, संपादक, समीक्षक, अनुवादक, शिक्षक, विद्यार्थी आणि फिलोलॉजिकल शैक्षणिक संस्थांचे पदवीधर, कविता लिहिण्याची आवड असलेले लोक या उत्सवात सहभागी होतात. 15 नोव्हेंबर 1999 रोजी UNESCO (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) च्या सर्वसाधारण परिषदेच्या 30 व्या सत्राच्या ठरावाद्वारे अधिकृतपणे जागतिक कविता दिनाची स्थापना करण्यात आली. पहिल्यांदा 21 मार्च 1999 ला जागतिक कविता दिन साजरा करण्यात आला.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com