Women's Day: ...अन् स्त्री प्रधान संस्कृती असणारं जग पुरुष प्रधान झालं...

मंडळी काही ठिकाणी पुरुष हे स्त्रीपेक्षा अग्रेसर आहेत आणि राहतीलपण... आणि हे स्त्रीवर्गाने निर्विवादपणे मान्य करावं...
Women's Day
Women's DaySaam TV
Published On

योगिता तोडकर (मनोलया कन्स्लटंटस)

तिला सक्षम केलं तुम्ही!!! खरं तर ती सक्षम होतीच... फक्त अजून ज्या कोणत्या चार ठिकाणी तिचा हातभार लागणं अपेक्षित होतं, ते ती पूर्ण करतीये... आणि वेळेस हे करताना ती एकटी तर एकटी पण उभी राहिलीय... 'व्होल्गा ते गंगा' या पुस्तकात आणि बऱ्याच ठिकाणी। आपल्या निदर्शनास येऊं शकत की मुळात स्त्री प्रधान संस्कृती असणारं जग... कालांतराने काही कारणांनी ते पुरुष प्रधान बनत गेलं... मग अशा 'ती'चं काय कौतुक मांडव आणि तिच्यात काय बदलावं... कारण मुळात प्रश्न तो नाहीचे...

मंडळी काही ठिकाणी पुरुष हे स्त्रीपेक्षा अग्रेसर आहेत आणि राहतीलपण... आणि हे स्त्रीवर्गाने निर्विवादपणे मान्य करावं... एकमेकांना पूरक आहोत हो आपण... अर्धनारिंनटेश्वर... एकट्याचं आयुष्यं एकमेकांशिवाय अट्टाहासाने पूर्ण करता येईल.. पण 'निर्मिती' आणि जगाचं रहाटगाडगं यासाठी बरोबर असणं आहे हो...

बरं पण मेख कुठे आहे... समाजाच्या लेखी 'आपण' स्त्रियांना सक्षम करत आहोत... बरं... घटकाभर हे मान्य... पण मग स्त्री वर्गाच्या वेदना बऱ्याच अर्थांनी तशाच का बरं राहिल्यात... त्याला साधारण दोन कारण दिसतायत...

Women's Day
मोबाईल नंबर बदलला अन् खात्यातून 8 लाख गायब; कसे वाचा सविस्तर...

एक कारण म्हणजे स्वतः स्त्रीच... स्वतःला अजूनही एका ठराविक किंवा त्याहीपेक्षा खाली वैचारिक आणि मानसिक दृष्टया आणून ठेवणं... प्रश्नांची उत्तरं न शोधता प्रश्नांनाच खूप जास्त महत्व देणं... आणि मग त्यासाठी भावनिक होणं... मग वेळेस स्त्रीवादी होत जातात या बायका... ज्याला खरं तर तसा अर्थ नाही हो... तसंही कायम आक्रमक होऊन किंवा टोकाला जाऊन प्रश्न सुटत असते तर मानसिक स्वास्थ्य उत्तमच राहील असतं सगळ्यांच...

दुसरं कारण म्हणजे जे प्रकर्षाने अलीकडे जाणवतंय ते सक्षम झालेल्या स्त्री वर्गाला सामोरं जाणारा, समजून घेणारा वर्ग (स्त्री आणि पुरुष दोन्ही) मानसिक आणि वैचारिक दृष्ट्या सक्षम आहे का??? काही अंशी आहे, पूर्णतः नाही...आपण हे मान्य करताना इथे होणारी एक गल्लतपण नक्कीच लक्षात घेतली पाहिजे...आजच्या पिढीतील स्त्री वर्ग स्वतःच्या नवऱ्याबरोबर वा घरातल्या मंडळींसोबत अर्थाअर्थी पारदर्शकता मेंटेन करण याला डॉमीनेशनच नाव देतोय... तो मला सांगत नाही, मग मी का??? अहो पण नात्यातला आपलेपणा जपावा की दुरावा वाढवावा हा आपलाच निर्णय... आता असं वाटून घेऊ नका आम्हीच मक्ता घेतलाय का त्याचा... अगं तुझी सामावून घेण्याची ताकद आहे तेवढी... निसर्गाने जन्मतःच दिलेली... त्याचा अभिमान बाळगून तसं वागायचं की फाटे फोडायचे ठरवावं आपणच...

राहता राहिला प्रश्न समाजाच्या, घरातल्यांच्या सक्षमीकरणाचा...

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।

असा मंत्र आपण म्हणतो मग तो आमलात का नाही आणायचा? पैसा, विद्या, आणि वेळेस त्या पुरुषाला सावरणारी 'तू'च ना ग... खुद्द सृष्टीनिर्मिती केलेल्या ब्रम्हदेवाने निर्मितीची ताकद जीच्यामध्ये दिली तीही 'तू'च... मग जडण घडण करणं अवघड आहे का? खूप मार्ग असू शकतील त्यासाठी...पण प्रेम हा सगळ्यात सोप्पा...जो इंनबिल्ट आहे आपल्यात...

एकच गोष्ट लक्षात घेऊयात... फक्त 'स्वीकारावं'... मग कोणावरही काम करावं लागतं नाही... ते होत जातं... तुमच्यात असणारी 'पॉझिटिव्हीटी' सगळ्यांचा ऑराच बदलते...

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com