मोबाईल नंबर बदलला अन् खात्यातून 8 लाख गायब; कसे वाचा सविस्तर...

सिम बंद झाले म्हणून संबंधित महिलेनं लगेचच दुसर्‍या क्रमांकाचे सिम खरेदी केलं.
Nashik News
Nashik News Saam TV
Published On

नाशिक: तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलणार असाल, तर सावध व्हा... कारण बदललेला मोबाईल नंबर तुम्हाला चांगलाचं महागात पडू शकतो. मोबाइल नंबर बदलल्याने एका महिलेच्या बँक खात्यातून तब्बल 8 लाख 16 हजार रुपये लंपास केल्याचा संदेश सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होतोय. या महिलेने तिच्या बँक खात्याशी जो मोबाइल नंबर लिंक केला होता, तो तिने जवळपास चार वर्षे बंद होता. मात्र हा नंबर बँकेच्या KYCमधूनही हटवला नव्हता. तर दुसरीकडे नंबर वापरात नसल्याने सिम कार्ड कंपनीने तो नंबर दुसर्‍या ग्राहकाला देऊ केला.

सिम बंद झाले म्हणून संबंधित महिलेनं लगेचच दुसर्‍या क्रमांकाचे सिम खरेदी केलं. याबाबतचीही कुठलीच माहिती तिने बँकेला दिली नाही. त्यामुळे त्या महिलेच्या बँकेचे सर्व SMS नोंद केलेल्या मोबाइल नंबरवर जाऊ लागले. त्यामुळे ज्याला त्या महिलेचा नंबर दिला गेला, त्याच्यापर्यंत त्या महिलेच्या सर्व बँकेचे डिटेल्स एसएमएसच्या माध्यमातून पोहोचू लागले. पुढे त्या व्यक्तीने एसएमएसमधील बँकेच्या लिंकवर क्लिक करून बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर प्रवेश केला. ‘फरगेट पासवर्ड’ टाकून त्याने बँकेचा ओटीपी त्याच्या ताब्यात असलेल्या मोबाइल नंबरवर मिळवला. पुढे इतर औपचारिकता पूर्ण करून त्याने इंटरनेट बँकिंगद्वारे खात्यातील तब्बल 8 लाख 16 हजार रुपये काढून घेतले. असा संदेश समाजमाध्यमांवर सर्वत्र व्हायरल होत आहे.

Nashik News
मुंबईत विरुद्ध दिशेने गाडी चावल्यास थेट तुरुंगवारी, गाडी जप्त करण्याचेही आयुक्तांचे आदेश

मोबाईल नंबर बदलतांना काय काळजी घ्याल

- मोबाइल नंबर बदलताना किंवा वापरात नसलेला किंवा बंद असलेला जुना मोबाइल नंबर आपण कोठेही लिंक केला आहे काय, याची खातरजमा करायला हवी.

- बँकिंग नियमानुसार बँकेत जाऊन तो नंबर डिलिट करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा अशा प्रकारे फसवणूक होऊ शकते.

- मोबाइल सिम कार्ड कंपनीच्या पॉलिसीनुसार जर कोणताही नंबर सहा महिन्यांपर्यंत वापरला गेला नसेल, तर तो दुसर्‍या ग्राहकाला हस्तांतरित करण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो.

- त्यामुळे जर तुमचा मोबाइल क्रमांक सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद असेल, तर तो सुरू आहे की बंद, याबाबतची तत्काळ खातरजमा करून घ्यावी.

- मृतांच्या मोबाइलबाबत बँकेला कळवा

- कुटुंबातील एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर तिच्या मोबाईल नंबरकडे बर्‍याचदा दुर्लक्ष केले जाते. पण ही बाब धोकादायक ठरू शकते. त्यामुळे मृत व्यक्तीच्या मोबाईल नंबरची माहिती तत्काळ बँकेला कळवायला हवी.

बर्‍याचदा मोबाईल हरवला अथवा अन्य कारणांमुळे मोबाइल नंबर बदलला जातो. मात्र इतक्या सहजासहजी नंबर बदलणे खरचं योग्य आहे का? याचा जर कोणी विचार करत नसेल, तर त्याला मोठा फटका बसू शकतो. हल्ली आधार कार्डपासून ते बँकेपर्यंत मोबाइल नंबर लिंक करावा लागत असल्याने तुमचा मोबाइल नंबर बदलताना प्रचंड सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com