Women's health tips: कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेताना महिलांनी स्वतःकडे दुर्लक्ष करु नका; महिलांनो 'या' टीप्स करा फॉलो

How women should take care of themselves: भारतीय समाजात महिला कुटुंब आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यात स्वतःला झोकून देतात. अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते, ज्यामुळे त्यांना भविष्यात अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते.
tips women
tips womensaam tv
Published On

दरवर्षी २४ जुलै हा सेल्फ केअर डे म्हणून साजरा होतो. माणसाचे शारीरिक मानसिक स्वास्थ्य ही त्याची स्वतः ची जबाबदारी आहे, ते स्वास्थ्य जपण्यासाठी त्याने स्वतः च स्वत:ची काळजी घ्यायला हवी यासाठी जनजागृती हे या दिवसाचे वैशिष्ट्य. यानिमित्त गर्भवती मातांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आणि त्यांच्या कुटुंबांसाठी आणि विशेषतः त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी एक मजबूत पाया तयार करण्यासाठी जागरुक केले जाते.

मुंबईतील झायनोवा शाल्बी हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्वेता लालगुडी यांनी सांगितलं की, बदलत्या काळानुसार तसंच वाढत्या स्पर्धेमुळे आता महिलावर्ग कुटुंब, नोकरीसारख्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तारेवरची कसरत करतात. आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्याच्या प्रयत्नांमध्ये मात्र त्या स्वतःच्या तब्येतीकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. प्रत्येक महिलेने हे लक्षात घेतले पाहिजे की सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःच्या आरोग्याचीही तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे.

स्वतःची काळजी घेण्याच्या छोट्या, दैनंदिन कृती या त्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारण्यात मदत करतात. मानसिकदृष्ट्या निरोगी आई ही बाळाचं संगोपन करण्यासाठी तसंच निरोगी कुटुंब तयार करण्यासाठी सक्षम असतात. स्वतःची काळजी घेणं म्हणजे केवळ स्पा करणं किंवा सुट्टीवर जाणं असं नसून तुमच्या शारीरीक आणि मानसिक गरजा, तुमच्या भावना आणि उर्जेची पातळी तपासण्यासाठी खास वेळ काढणं म्हणजे स्वतःसाठी पुरेसा वेळ देणं आहे, असंही डॉ. श्वेता यांनी सांगितलंय.

tips women
Brain improvement exercises: फोकस आणि स्मरणशक्ती वाढवायचीये? डॉक्टरांनी सांगितले मेंदूचे 3 सोपे व्यायाम, आजपासूनच करून पाहा

या टिप्सचे पालन करा

दररोज 'मी-टाइम' काढा

दिवसातून ३० मिनिटे वाचन, चालणे, संगीत ऐकणे किंवा काही न करता केवळ शांत बसणे देखील तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते.नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे देखील गरजेचे आहे. जंक फुड, तेलकट, हवाबंद डब्यातील पदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थांचे सेवन टाळा. लठ्ठपणा, रक्तदाब आणि उच्च रक्तातील साखरेची पातळी निर्माण करणारे आणि पोटासंबंधीत समस्येस कारणीभूत घटकांपासून दूर रहा.

पुरेशी झोप घ्या

झोपेला प्राधान्य द्या. विश्रांतीच्या अभावाने तणाव, मूड स्विंग्ज आणि भावनिकदृष्ट्या कमकुवतपणा येतो. किमान ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे गरजेचे आहे.

क्षमतेनुसार कार्य करा

नाही म्हणायला शिका. तुमचा वेळ आणि उर्जेचे रक्षण करणे गरजेचे आहे. शारीरीक क्षमतेहून अधिक य कष्ट करू नका.

tips women
Heart Attack: कोणत्याही लक्षणांविनाही येऊ शकतो हार्ट अटॅक; पाहा सायलेंट हार्ट अटॅकचा धोका कोणाला जास्त?

इतरांशी कनेक्टेड रहा

मित्रांशी चर्चा करा किंवा सपोर्ट ग्रुपमध्ये सामील व्हा. तुमचे विचार एकमेकांसोबत व्यक्त केल्याने भावनिकदृष्ट्या भार कमी होतो आणि तुम्हाला येते की एकटेपणा येत नाही. तुमच्या भावना दाबून ठेवण्याऐवजी मोकळे व्हा.

tips women
Early signs of lung cancer : फुफ्फुसांचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' ४ मोठे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

माइंडफुलनेसचा सराव करा

खोल श्वास घेणे, जर्नलिंग करणे किंवा ध्यान करणे हे तुम्हाला स्थिर राहण्यास मदत करू शकते, विशेषतः जेव्हा तुम्हाला दडपण आल्यासारखे वाटते तेव्हा याचा फायदा होतो.

जेव्हा एखादी माता स्वतःच्या गरजांची काळजी घेतात, तेव्हा त्या त्यांच्या मुलांना निरोगी सवयी लावू शकतात आणि दीर्घकालीन मानसिक थकवा टाळू शकतात. म्हणून, वरील टिप्स अंमलात करण्याचा प्रयत्न करा आणि निरोगी राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com