Women Health : महिलांनो, 'या' 3 प्रकारचे ज्यूस प्या; सगळे आजार दूर पळतील, सौंदर्यातही पडेल भर

हल्ली वयाची ३० वी ओलाडल्यानंतर महिलांच्या शरीरातील पेशींची निर्मिती ही मंदावायला लागते.
Women Health
Women Health Saam Tv
Published On

Women Health : बदलेल्या जीवनशैलीनुसार स्त्रियांना स्वत: कडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. घरातले काम व ऑफिसच्या जबाबदाऱ्यांनी त्यांना इतके गुंतवलेले असते की, त्यांना स्वत:च्या आरोग्याची नीट काळजी घेता येत नाही.

हल्ली वयाची ३० वी ओलाडल्यानंतर शरीरातील पेशींची निर्मिती ही मंदावायला लागते. ज्यामुळे स्नायू, यकृत, किडनी यासह अनेक अवयवांवर परिणाम होतो. याशिवाय हाडे कमकुवत झाल्यास दैनंदिन जीवनातील सामान्य कामकाजात अडचणी येतात. अशा स्थितीत आपण आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. आरोग्यात कोणते पदार्थ खायाला हवे याची काळजी देखील घ्यायला हवी. चला जाणून घेऊया रोज सकाळी कोणत्या ज्यूसचे सेवन करायला हवे.

Women Health
Women Health : प्रसूतीनंतर निदान महिनाभर तरी महिलांनी घ्यायला हवी 'या' गोष्टीची काळजी

महिलांना अनेकदा त्यांच्या सौंदर्याची विशेष काळजी घ्यावी लागते, त्यासाठी त्वचेची आणि केसांची काळजी घेतली जाते. यासाठी केवळ महागड्या आणि रसायनांवर आधारित उत्पादनेच वापरली पाहिजेत असे नाही, तर तुम्ही अंतर्गत पोषक तत्वांद्वारे केस आणि त्वचेला चमक आणू शकता. एकंदरीत आरोग्य सुधारण्यासाठी महिलांनी काय खावे ते जाणून घेऊया.

1. मिक्स फळांचा ज्यूस

Mix Fruit Juice
Mix Fruit JuiceCanva

फळांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे आढळतात, त्यामुळे ते शरीराला तसेच मेंदूलाही लाभदायक ठरतात. यामुळे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या धोकादायक हृदयविकारापासून बचाव होईल. यासोबतच हे डोळे, त्वचा आणि केसांसाठीही (Hair) खूप फायदेशीर आहे.

2. नारळ पाणी

Coconut Water
Coconut WaterCanva

नारळाचे पाणी हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु, ते रोज पिणे प्रत्येकाला जमत नाही. अनेकदा हे आपल्याला समुद्रकिनारी सुट्टीवर गेल्यावर याचा आस्वाद घेता येतो. नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवते. नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहातो. तसेच त्वचेच्या अनेक समस्या देखील दूर राहातात.

3. भाज्यांचा रस

Vegetable Juice
Vegetable Juice Canva

हिरव्या भाज्या नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. अनेकदा आपण याचा वापर अन्नपदार्थामध्ये करतो. आपल्या आहारात भाज्यांच्या ज्यूसचा समावेश करण्याची सवय लावा. यामुळे शरीराला जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, झिंक आणि कॅरोनाइड्स सारखे पोषक तत्व मिळतात. त्यामुळे उच्च रक्तदाब, अॅनिमिया, त्वचेच्या समस्या यांसारख्या समस्या दूर होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com