Drinking Water: जितके फायदे तितकेच दुष्परिणाम; पाणी पिताना तुम्हीही या चुका करता का?

Water Effect On Helath: ज्या पदार्थांनी शरीराला गरमी मिळते असे पदार्थ खाण्यावर सर्वजण भर देततात. यासह थंड पाणी पिने देखील टाळतात. पाणी उकळून गरम करून पितात.
Drinking Water
Drinking WaterSaam TV
Published On

Winters Hot Cold Or Warm Water:

राज्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीमध्ये अनेक जण गरम पदार्थांचे जास्त सेवन करतात. ज्या पदार्थांनी शरीराला गरमी मिळते असे पदार्थ खाण्यावर सर्वजण भर देततात. यासह थंड पाणी पिने देखील टाळतात. पाणी उकळून गरम करून पितात. गरम पाण्याने आपल्याला जास्त थंडी जाणणार नाही असा अनेकांचा समज असतो.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Drinking Water
Leopard Entered Hospital : शहादा शहरातील रुग्णालयात घुसला बिबट्या; चार तासानंतर अडकला पिंजऱ्यात

थंडीच्या दिवसांत वातावरणात प्रचंड गारवा असल्याने सर्वत्र शेकोट्या पेटल्यात. थंडी असल्याने बरेच जण आहारातील पाण्याचे सेवन देखील कमी करतात. मात्र पाणी कमी पिल्याने डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवतात. अशात थंडीच्या दिवसांत पाणी किती प्यावे आणि कसे प्यावे. कोणत्या पद्धतीचा फायदा होतो आणि कोणत्या पद्धतीचा तोटा याबाबत जाणून घेऊ.

सर्दी, खोकला

सर्दी, खोकला अशा आजारांनी सत्र्स असल्यास थंड पाणी पिने टाळावे. सर्दी, खोकल्यामध्ये नाक आणि घसा दुखत असतो. त्यामुळे थंड पाणी पिल्यास हा त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे बाहेर कुठे गेल्यावर देखील गरम पाण्याचेच सेवन करावे. याने तुमचा घसा दुखणार नाही.

थंडीच्या दिवसांत गरम किंवा कोमट पाणी पिल्याने तुमची पचनक्रीया चांगली राहते. मात्र जर तुम्ही संपूर्ण हिवाळ्यात कोमट पाणी प्यायले तर तुम्हाला कमी तहान लागेल. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्त गरम पाणी पिऊ नका. कोमट किंवा गरम करून थंड केलेलं पाणी दिवसभर थोड्या थोज्या वेळाने पित राहा.

कायम थंड पाणी पित असाल आणि थंडीत गरम पाणी पिण्यास सुरूवात केलीये अशा हार्ट पेशंट असलेल्या व्यक्तींना याचा त्रास जाणवू शकतो. थंडीच्या दिवसांत जास्त गरम पाणी पिल्याने हार्ट बीट्स वाढतात. मात्र गरम पाणी न पिल्यास फक्त थंडच पाणी पिले तर एनर्जी लेवल कमी होते आणि अशक्तपणा येतो.

त्यामुळे थंडीच्या दिवसांत तुम्ही कोमट पाणी पिने गरजेचे आहे. मात्र हे पाणी पिताना गरम असलेलं पाणी प्लास्टीकच्या बॉटलमध्ये किंवा भांड्यात ठेवू नका. तापमाण जास्त असल्याने प्लास्टीक वितळूही शकते.

Drinking Water
Amravati Crime News: बस का थांबवली नाही? संतापलेल्या प्रवाशांकडून चालकाला मारहाण; अमरावतीमधील धक्कादायक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com