Gmail Account Close : गुगल बंद करणार का Gmail ? यात तुमचे देखील अकाउंट आहे का? कसे कळेल? जाणून घ्या

Why Google Account Is close : गुगलकडून अनेक जीमेल अकाउंट बंद करण्यात आले आहे.
Gmail Account Close
Gmail Account CloseSaam Tv
Published On

Google Action On Gmail Account : जगभरात Gmail चा वापर करणारे लोक अनेक आहेत. कामाच्या ठिकाणापासून ते शिक्षणापर्यंत अनेकांना याचा वापर होतो. कधी कधी अनवधानाने किंवा शॉपिंग (Shopping) साईट्स, फूड कोट, मूव्ही टिकीट व अशा अनेक ठिकाणी आपण आपल्या जीमेलचे लॉग इन करतो.

अशावेळी आपले जीमेलचे अकाउंट फुल होते. असे कळले आहे की, गुगलकडून अनेक जीमेल अकाउंट बंद करण्यात आले आहे. गूगलने (Google) असे सांगितले आहे की, डिसेंबर २०२३ पासून जीमेल व गुगल फोटोचे अकाउंट बंद करण्यात येणार आहे. आता तुम्हाला देखील प्रश्न पडला आहे का ? यात तुमचे देखील अकाउंट (Account) आहे का ? जाणून घेऊया त्याबद्दल

Gmail Account Close
Google AI Features : गुगलचं नवं अपडेट! अ‍ॅपमध्ये AI फीचर्स, जाणून घ्या काय आहे खास

गुगलने सांगितले आहे की, इनअॅक्टिव्ह असणारे जीमेल व Google Photos ची खाती बंद करण्यात येतील. याचा अर्थ असा की, गुगल अशी सर्व खाती बंद करेल जी एक-दोन वर्षांपासून बंद आहेत.

1. Gmail चे अकाउंट का बंद केले जाणार आहे ?

गुगलचे मत आहे की, एक-दोन वर्षांपासून बंद असलेली खाती आता बंद करण्यात येणार आहे. Google ला असे वाटते की, यामुळे फेक अकाउंट बंद होतील व सुरक्षा (Security) अधिक बळकट करता येईल.

Gmail Account Close
Gmail Spam Emails : जीमेल ला येणाऱ्या स्पॅम ईमेल पासून त्रस्त आहात ? 'ही' ट्रिक्स वापरुन पहा

2. कोणती खाती बंद करता येणार ?

गुगलने असे सांगितले की, Gmail आणि Google Photos खाते बंद केले जाणार आहे. हा नियम शाळा व व्यवसायिकदारांसाठी नसणार आहेत.

3. कोणत्या अकाउंटला करावा लागणार बाय-बाय ?

गुगलच्या मते, इनअॅक्टिव्ह असणारे अकाउंट एकाच वेळी बंद होणार नाही. याची देखील एक वेगळी प्रोसेस असेल. सर्वात आधी ती खाती बंद केली जातील जी ओपन केल्यापासून कधीच वापरली गेली नाही आहेत. कोणतेही खाते बंद करण्यापूर्वी गुगल त्यांना मेल पाठवेल व काही दिवसांनंतर ते अकाउंट बंद करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com