World Book and Copyright Day 2023 : जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन का साजरा केला जातो ? जाणून घ्या महत्त्व, इतिहास आणि थीम

Book and Copyright Day : दरवर्षी 23 एप्रिल रोजी जगभरात जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा केला जातो.
World Book and Copyright Day 2023
World Book and Copyright Day 2023 Saam Tv

World Book and Copyright Day : दरवर्षी 23 एप्रिल रोजी जगभरात जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा केला जातो. बदलत्या काळानुसार आता पुस्तकांची जागा संगणक आणि इंटरनेटने घेतली आहे.

त्यामुळे लोक आता वाचण्यासाठी क्वचितच पुस्तकांचा (Books) वापर करतात. त्यामुळे लोकांना (People) पुस्तकांचे महत्त्व कळावे आणि या उद्देशाने युनेस्कोने 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा (Celebrate) करण्याचा निर्णय घेतला.

World Book and Copyright Day 2023
LPG Gas Booking Through WhatsApp : एका क्लिकवर करता येणार WhatsApp वरून सिलिंडर बुक, जाणून घ्या योग्य पद्धत

इतिहास -

जागतिक पुस्तक दिनाची सुरुवात 1922 मध्ये सर्व्हेन्टेस पब्लिशिंग हाऊसचे संचालक व्हिसेंट क्लेव्हेल यांनी केली होती. मिगुएल डी सर्व्हंटेसचा सन्मान करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतरच 1926 मध्ये बार्सिलोनामध्ये पहिला जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला.

हा पुस्तक दिन 7 ऑक्टोबर रोजी मिगुएल डी सर्व्हंटेसच्या जन्मदिनी साजरा करण्यात आला. पण नंतर, हा दिवस साजरा करण्यासाठी मिगुएल डी सर्व्हंटेसच्या मृत्यूचा दिवस म्हणजे 23 एप्रिल निवडला गेला.

थीम -

जागतिक पुस्तक दिन दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो. या वर्षाची 2023 ची थीम 'Indigenous Languages' आहे. ही थीम ठेवण्यामागचा उद्देश देशात आणि जगात सध्या असलेल्या विविध भाषांचे महत्त्व समजून घेणे हा आहे. ही थीम ठेवण्याचे आणखी एक कारण म्हणजे स्थानिक भाषांची चेष्टा करू नका, त्यांचा आदर करा आणि त्यांना नामशेष होण्यापासून वाचवा.

World Book and Copyright Day 2023
Reading Book Before Going Bed : झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

महत्त्व -

  • जागतिक पुस्तक दिन लोकांना पुस्तकांचा आणि लेखकांचा आदर करायला शिकवतो. ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास आहे.

  • जागतिक पुस्तक दिन जगभरातील लोकांना, विशेषत: मीडिया, लेखक आणि शैक्षणिक यांसारख्या पुस्तक उद्योगाच्या संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या लोकांना आदर देण्यासाठी साजरा केला जातो.

  • जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन हे सुनिश्चित करतो की साक्षरतेला त्याच्या सर्व प्रकारांमध्ये प्रोत्साहन दिले जावे आणि लोकांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक संसाधनांमध्ये प्रवेश मिळावा.

World Book and Copyright Day 2023
Puneri Patya | पुणेरी पाट्या कोणी सुरू केल्या? पाहूयात या मागची कहाणी

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com