25 डिसेंबरलाच का Christmas Day साजरा केला जातो? जाणून घ्या कारण आणि इतिहास

History Of Christmas Day : ख्रिसमस हा सण जगभरात 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाला 'नाताळ'असेही म्हणतात. ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा सण असला तरी सर्व धर्म आणि संस्कृतीचे लोक तो उत्साहाने साजरा करतात.
Christmas Day 2023
Christmas Day 2023Saam Tv
Published On

Christmas Day 2023 :

ख्रिसमस हा सण जगभरात 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाला 'नाताळ'असेही म्हणतात. ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा सण असला तरी सर्व धर्म आणि संस्कृतीचे लोक तो उत्साहाने साजरा करतात. पण नाताळ 25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर या लेखाद्वारे जाणून घेऊया.

इतिहास

ख्रिसमसचा इतिहास हा येशू ख्रिस्ताच्या जन्माशी जोडलेला आहे, जो बायबलमध्ये लिहिलेला आहे. ख्रिश्चन धर्मानुसार, प्रभु येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला होता आणि म्हणून या दिवशी ख्रिसमस साजरा केला जातो.

तथापि, काही इतिहासकार आणि धार्मिक अनुयायांचा असा विश्वास आहे की, या दिवशी येशूचा जन्म झाला नव्हता आणि तो फक्त प्रतीकात्मक वाढदिवस आहे. बायबलमध्ये येशूची जन्मतारीख दिलेली नाही, परंतु तरीही दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताचा जन्म मेरीपासून झाला. असे मानले जाते की मेरीला एक स्वप्न पडले होते ज्यामध्ये तिने प्रभुचा पुत्र येशूला जन्म देण्याची भविष्यवाणी केली होती.

Christmas Day 2023
Interesting Facts | Christmas च्या रात्री Santa Clause का येतो?

ख्रिसमस प्रथमच केव्हा साजरा करण्यात आला?

ख्रिसमस हा शब्द मास ऑफ क्राइस्ट वरून आला आहे. ख्रिश्चन रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनच्या कारकिर्दीत 336 मध्ये प्रथम साजरा केला गेला. यानंतर पोप ज्युलियस यांनी येशू ख्रिस्ताचा अधिकृत वाढदिवस 25 डिसेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला.

Christmas Day 2023
अजूनही Office Colleague साठी Secret Santa चे Gift घेतले नाही? 5 भन्नाट Ideas पाहा

ख्रिसमस साजरा करण्याची आणखी काही कारणे

22 तारखेपासून दिवस लहान होत जातो. म्हणून 25 तारीख हा दिवस सूर्याचा पुनर्जन्म मानला जातो. त्यामुळे युरोपियन लोक 25 डिसेंबरला सूर्याच्या उत्तरायणाच्या दिवशी सण साजरा करत असत. ख्रिश्चन समुदायातील लोकांनी देखील हा दिवस प्रभु येशूचा जन्मदिवस म्हणून निवडला आणि त्याला ख्रिसमस असे नाव पडले. याआधी इस्टर हा ख्रिश्चन समुदायाचा मुख्य सण होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com