Diwali Padwa 2024: पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचं औक्षण का करते? जाणून घ्या पाडव्याचा शुभ मुहूर्त

Diwali Padwa 2024: उद्या म्हणजे २ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल प्रतिपदा ही तिथी आहे. कार्तिक प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. या दिवसाला बलिप्रतिपदा असंही म्हटलं जातं.
Diwali Padwa
Diwali Padwasaam tv
Published On

दिवाळीचा सण सुरु झाला असून आज सर्वांच्या घरी लक्ष्मीचं पूजन केलं जाणार आहे. या दिवशी आश्विन अमावस्येला दिवाळी साजरी केली जाणार आहे. तर उद्या विवाहितांसाठी खास दिवाळीचा खास दिवस आहे. उद्या म्हणजे २ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल प्रतिपदा ही तिथी आहे. कार्तिक प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. या दिवसाला बलिप्रतिपदा असंही म्हटलं जातं.

या दिवसाचं खास महत्त्व?

दिवाळी पाडव्याच्या दिवशी पती-पत्नीच्या नात्याला विशेष असं महत्त्व देण्यात आली. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळते. शिवाय यावेळी त्यांना उदंड आयुष्य लाभावं यासाठी देवाकडे प्रार्थना करते. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

पाडवा साजरा करण्यामागील कारण

पौराणिक कथेनुसार, असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता. राक्षस कुळामध्ये जन्म घेऊन देखील चारित्र्यवान, विनयशील, प्रजेच्या हितासाठी दक्ष राजा म्हणून बळी राजा ओळखला जात होता. राजा बलीने आपल्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केल्याचं म्हटलं जातं. बळी राजा हा अतिशय दानशूर होता. परंतु त्याला अहंकाराचा वारा लागल्याने तो अहंकारापासून दूर राहू शकला नाही. अहंकारामुळे माणसाची अधोगती होते. तसंच राजाचं सुद्धा तेच झाले आणि त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंनी वामनावतार म्हणून बटूचं रूप घेतलं आणि तो बळी राजाकडे दान मागायला गेला.

Diwali Padwa
Surya nakshatra gochar: सूर्याच्या नक्षत्र बदलाने 'या' राशींचं नशीब चमकणार; 'या' राशींच्या हाती येणार बक्कळ पैसा

यावेळी बळी राजाने एक यज्ञ केला आणि या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. ते दान घेण्याच्या निमित्ताने भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला. बटू वेशात ते बळी राजासमोर उभे राहिले आणि त्यांनी तीन पावलं जमीन मागितली. यावेळी वचनाला जागून बळी राजाने हे दान देण्याची तयारी दाखविली, तेव्हा वामनावतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी लोक व्यापलं. तिसरं पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळी राजाने आपलं डोके पुढे केलं. तीन पावलांमध्ये भगवान विष्णूंनी बळी राजाकडून सर्व काही काढून घेतलं. यावेळी बळी राजाच्या मनाचा उदारपणा बघून भगवान श्रीहरी विष्णू बळी राजावर प्रसन्न झालं आणि त्याला त्यांनी पाताळाचं राज्य देऊ केलं.

या संपूर्ण प्रसंगामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची लीला पाहून अर्थात आपल्या पतीची लीला आणि औदार्य पाहून लक्ष्मी प्रसन्न झाली. यावेळी तिने भगवान श्रीहरी विष्णूंना ओवाळलं. भगवान श्रीहरी विष्णूंनीसुद्धा माता लक्ष्मीला ओवाळणी दिली आणि त्या दिवसापासून पत्नी पतीचं औक्षण करतं. तेव्हापासून या दिवस पाडवा साजरा केला जातो.

पाडव्याच्या दिवसाचा मूहुर्त

सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपासून ते सकाळी ९ वाजून ३१ मिनिटांपर्यंत या दिवसाचा शुभ मुहूर्त आहे. त्याचप्रमाणे तसेच सकाळी ५ ते ८ पर्यंत अमृत मुहूर्त आणि दुपारी ३ वाजून १२ मिनिटांपासून ते ४ वाजून ३६ मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त असणार आहे. या दिवाळीत पतीला ओवाळण्यासाठी संध्याकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत मुहूर्त असणार आहे.

Diwali Padwa
Diwali 2024 : दिवाळीला बनतोय दुर्मिळ संयोग, 3 राजयोग 'या' राशींच्या तिजोरीत पाडणार पैशांचा पाऊस

डिस्क्लेमर- आम्ही असा दावा करत नाही की या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com