Pregnancy Tips : गरोदरपणात शरीरात रक्ताची कमतरता का होते? जाणून घ्या एक्सपर्ट्सचे मत

Hemoglobin Low During Pregnancy : आई होण्याचा अनुभव हा प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर असतो.
Pregnancy Tips
Pregnancy Tips Saam Tv
Published On

Pregnancy Tips : आई होण्याचा अनुभव हा प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर असतो. ज्यामध्ये स्त्री वारंवार शारीरिक आणि मानसिक रूपामधून अनुभव घेत असते. स्त्री गरोदर असताना तिच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल होतात.

हे बदल काही प्रमाणात सरळ असतात तर काही बदल तुम्हाला सावधान व्हायची चेतावणी देतात. गरोदर असताना होणाऱ्या समस्या या प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळ्या प्रकारे होताना दिसून येतात. परंतु वेळीस या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. अशातच गर्भावस्थेमध्ये (Pregnant)अनेक महिलांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याची समस्या दिसून येते.

जर वेळीस या गोष्टीकडे लक्ष दिले नाही तर, ही समस्या गंभीर रूप घेऊ शकते. याविषयी पुण्यामधील टेस्ट ट्यूब बेबी कन्सल्टेट आणि स्त्री प्रसूती रोग विशेषतज्ञ डॉक्टर सुप्रिया पुराणिक यांच्याकडून जाणून घेऊया.

डॉक्टर सुप्रिया पुराणिक यांच्या म्हणण्यानुसार गर्भावस्थेमध्ये महिलांच्या (Women) शरीरामध्ये हिमोग्लोबिनचा स्तर सामान्य असणे अत्यंत आवश्यक असते. गर्भावस्थेमध्ये आपल्या शरीरामधील रक्ताचे प्रमाण चाळीस टक्के वाढलेले असते.

रक्तामध्ये दोन प्रकारचे कम्पोनेंन्ट असतात ज्यांना ब्लड सेल्स आणि प्लाजमा म्हणतात. लाल रक्त कोशिकांच्या तुलनेमध्ये प्लाजमा जास्त प्रमाणात बनतो. म्हणूनच गर्भावस्थेमध्ये हिमोग्लोबिनचा स्तर कमी होतो.

Pregnancy Tips
Pregnancy: गरोदर महिलांनी अंडे खाणे योग्य की अयोग्य?

हिमोग्लोबिन काय असते ?

हिमोग्लोबिन हे एक प्रोटीन आहे. जे लाल रक्त कोशिकांमध्ये उपलब्ध असते. जे रक्तामध्ये ऑक्सिजन घेऊन जाण्यासाठी मदत करते. अध्ययनानुसार लहान मुलांमध्ये हिमोग्लोबिन स्तर अकरा ग्राम डीएल एवढा असला पाहिजे.

अशातच वयस्क पुरुषांमध्ये याचा स्तर 14 डी एल आणि महिलांमध्ये 12 डी एल एवढा असला पाहिजे. जर तुमच्या शरीरामध्ये यापेक्षाही कमी हिमोग्लोबिनचा स्तर असेल तर, तुम्हाला आवश्यक पोषक तत्वांची गरज आहे.

गर्भावस्थामध्ये हिमोग्लोबिनची कमी का भासते ?

डॉक्टर सुप्रिया पुराणिक यांच्या म्हणण्यानुसार गर्भावस्थेमध्ये हिमोग्लोबिन कमी होणे हे एक सामान्य कारण आहे. चुकलेल्या गर्भावस्थेमध्ये रक्तामध्ये पाण्याची यात्रा वाढते. म्हणूनच रक्त पातळ होते.

अशातच जसजसे रक्त पातळ होत जाते, तस तसे हिमोग्लोबिन देखील कमी होत जाते. काही लोकांना असं वाटतं की आयर्नच्या कमीमुळे शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी होते. विशेष तज्ञांचा ऐकाल तर, आयरन आणि हिमोग्लोबिनचा गर्भावस्थेसोबत काहीही घेण देण नसतं.

Pregnancy Tips
Pregnancy To Delivery Cost : आई होणे दीड पटीने महागले; हॉटेलपेक्षा महागडा हॉस्पिटलचा बेड...

गर्भावस्थेमध्ये हिमोग्लोबिनची मात्रा किती असली पाहिजे ?

डॉक्टर सुप्रिया पुराणिक यांच्या अनुसरे गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये आणि तिसऱ्या तीन महिन्यांमध्ये हिमोग्लोबिनची मात्रा अकराच्या वरती असली पाहिजे. अशातच दुसऱ्या तिमाहीच्या वेळी हिमोग्लोबिनची मात्रा 10.5 च्या वरती असली पाहिजे.

त्याचबरोबर डिलिव्हरीच्या वेळी शरीरामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा चांगली असली पाहिजे. कारण की डिलिव्हरीच्या वेळी जास्त ब्लीडिंग होते. त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर, तुम्हाला रक्त चढवावे लागेल. सोबतच आईची स्थिती गंभीर होते आणि संक्रमण होण्याची संभावना वाढते. रक्तामध्ये छोटे छोटे थक्के होऊ शकतात.

कमी हिमोग्लोबिनची लक्षणे ?

जेव्हा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये पाण्याचा स्तर वाढतो म्हणजेच रक्तामध्ये जेव्हा पाणी वाढते तेव्हा हिमोग्लोबिन कमी होते. अशा स्थितीमध्ये शरीरामध्ये कमजोरी, थकवा जाणवतो. त्याचबरोबर रक्ताची कमतरता देखील भासते.

हिमोग्लोबिन स्वाभाविक रूपानुसार वाढवले जाऊ शकते का ?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शरीरामध्ये हिमोग्लोबिन बनवण्यासाठी शरीराला आयर्नची गरज असते. कारण की शरीरामध्ये गरजेचे पोषक तत्व आधीपासूनच उपलब्ध असतात. विशेष तज्ञांनुसार प्राकृतिक रूपाने हिमोग्लोबिन वाढवायचे असेल तर, भरपूर प्रमाणात आयर्न असलेल्या अन्नाचे सेवन केले पाहिजे.

यासाठी तुम्ही जास्त प्रमाणात हिरव्या पालेभाज्या जसं की पालक, शेपू, मेथी, मुळा यासारख्या भाज्यांचे सेवन केले पाहिजे. त्याचबरोबर माणसाहरी लोक चिकन आणि मच्छीचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर खजूर आणि अंजीर यासारख्या सुख्या मेव्याचे सेवन केल्याने शरीरामध्ये आयर्न निर्माण होते. सोबतच गुळ खाल्ल्याने आणि लोखंडाच्या कढईमध्ये जेवण बनवून खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com