International Family Day 2023 : 'आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन' का साजरा केला जातो ? जाणून घ्या इतिहास व महत्त्व

International Family Day Importance : आज जगभरात सगळीकडे कुटुंब दिन साजरा केला जात आहे.
International Family Day 2023
International Family Day 2023Saam Tv
Published On

History of International Family Day : कुटुंब जर एकत्र असेल तर आपण कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊ शकतो. कुटुंबाशिवाय प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य अपूर्ण असते. तुम्ही आयुष्यात कितीही यशस्वी झालात तरीही त्या सुखाचा आनंद तुम्हाला घेता येणार नाही. आज जगभरात सगळीकडे कुटुंब दिन साजरा केला जात आहे.

दरवर्षी १५ मे ला आंतरराष्ट्रीय कुटुंब (Family) दिवस साजरा केला जातो. परंतु, विभक्त कुटुंब हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा (Celebrate) करणे महत्त्वाचे मानले जाते. हल्लीच्या पिढीमध्ये हम दो, हमारे दो असे सुखी कुटुंबाचे जीवन असावे असे वाटते. त्यांना मोठी किंवा सासु-सासरे असणारे कुटुंब नकोसे वाटते. समाजात निर्माण होणाऱ्या अशा गोष्टींना कसे थांबवाल. कुटुंब दिवस का साजरा केला जातो हे जाणून घेऊया.

International Family Day 2023
Indian Railway Rule : रेल्वेच्या मिडल बर्थ सिटबद्दल माहीत आहे का ? काय सांगतो रेल्वेचा नियम, प्रवाशांनी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

1. इतिहास (History)

संयुक्त राष्ट्रांच्या सभेने 1993 साली आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यादिवसापासून दरवर्षी जगभरात १५ मे रोजी जागतिक कुटुंब दिन साजरा केला जात आहे. जगभरातील लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता पसरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो.

International Family Day 2023
Kelvan Ceremony : 'हा' केळवणाचा ट्रेंड आला कुठून ?

2. उद्देश

या दिनांमागचा उद्देश असा की, कोणत्याही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहाणे. आपल्या कुटुंबाला एकत्र जोडून ठेवणे हा आहे. कुटुंबात प्रेम टिकून राहावे, त्यांच्या एकोपा राहावा, कोणत्याही कारणांमुळे नात्यात दूरावा येऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. तरुणांना कुटुंबाचे महत्त्व समजावे, चांगल्या-वाईट परिस्थितीत ठामपणे उभे राहावे हाच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com