Independence Day 2023: १५ ऑगस्टलाच का साजरा केला जातो स्वातंत्र्य दिन? जाणून घ्या यामागचे खास कारण

Independence Day History: स्वातंत्र्य दिन हा १५ ऑगस्टलाच का साजरा केला जातो? याचा विचार कधी केला आहे का?
Independence Day 2023
Independence Day 2023Saam Tv
Published On

Why 15th August Celebrated as Independence Day :

भारताला स्वातंत्र्य मिळालं ते १५ ऑगस्ट १९४७ रोजी. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्ष पूर्ण होत आहे.

दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्य दिनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा आपल्या भारताला ७६ वर्ष झाले असून २०२३ ला ७७ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. परंतु, स्वातंत्र्य दिन हा १५ ऑगस्टलाच का साजरा केला जातो? याचा विचार कधी केला आहे का? जाणून घेऊया यामागचे कारण (Reason)

Independence Day 2023
RBI Monetary Policy 2023: महागड्या कर्जातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; आरबीआयकडून नवीन पतधोरण जाहीर

1. स्वातंत्र्य दिनांचा इतिहास

भारताला (India) ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळावा यासाठी भगत सिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल या सगळ्यांसह अनेक नेत्यांनी आंदोलन सुरू केलं. पारतंत्र्याच्या बेड्या तोडून आपला देश उभा राहिला पाहिजे हे स्वप्न या सगळ्यांनीच पाहिलं होतं. त्यातूनच ही स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली. त्यानंतर इंग्रजांनी ही चळवळ हे आंदोलन मोडण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले. मात्र अखेर त्यांना आपला देश सोडून जावंच लागलं.

2. १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून का निवडला गेला?

१९२९ मध्ये काँग्रेस अध्यक्ष म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी ‘पूर्ण स्वराज’ किंवा ब्रिटीश वसाहतीपासून संपूर्ण स्वातंत्र्याची हाक दिली तेव्हा २६ जानेवारी हा पहिला ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून निवडला गेला. भारताला (India) स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून निवडला.

Independence Day 2023
Famous Place In Vidarbha : स्वर्गाहूनही सुंदर विदर्भातली ही ठिकाणं, निसर्गाचं सौंदर्य पाहून भुरळ पडेलच!

१९३० नंतर काँग्रेस पक्षाने हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करणे सुरूच ठेवले ज्या दिवशी भारत औपचारिकपणे सार्वभौम देश बनला आणि यापुढे ब्रिटीश अधिराज्य राहणार नाही त्या दिवशी भारत पूर्णपणे स्वतंत्र्य होईल असे ठरवले गेले.

Independence Day 2023
Famous Hill Stations in Konkan : डोळ्यांचे पारणं फेडणारं अन् निसर्गाच्या कुशीत वसेललं कोकणातील घाट

3. १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन कसा झाला?

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भारतीयांनी ब्रिटीशांना आपला देश सोडण्यास भाग पाडले. त्यानंतर ब्रिटिश संसदेने लॉर्ड माउंटबॅटन यांना भारताची सत्ता हस्तांतरित करण्याचा आदेश दिला. माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com