Post Delivery Diet: प्रसूतीनंतर आईने कोणते अन्नपदार्थ खायला हवे?

प्रसूतीपूर्वी अनेक अन्नपदार्थ खाण्याची चव जिभेला लागत असते.
Be sure to include these foods in your diet after delivery, Post Delivery Diet, after delivery diet
Be sure to include these foods in your diet after delivery, Post Delivery Diet, after delivery dietब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : प्रसूतीपूर्वी अनेक अन्नपदार्थ खाण्याची चव जिभेला लागत असते. जे पदार्थ आपल्याला खाऊ नये असे सांगितले जातात उलट तेच पदार्थ खाण्याची इच्छा अधिक होते.(food after delivery for indian mother)

हे देखील पहा -

प्रसूतीपूर्वी गरोदर महिलेला भरपूर पोषण तत्व असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. फळे(Fruit), पालेभाज्या, अंडी व अनेक दूधदुगधजन्य पदार्थ खायला हवे असे डॉक्टर सांगतात. परंतु, प्रसूतीनंतर बरेच पदार्थ खाण्यास मनाई केली जाते. प्रसूतीच्या काळात बाळाबरोबर आपल्याला स्वत:ची देखील अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रसूतीनंतर कोणते अन्नपदार्थ खायला हवे हे पाहूया.(Post delivery diet)

१. नुक्त्याच झालेल्या आईने शेंवग्याच्या पानांची भाजी खावी. यात जीवनसत्त्व (Vitamins) अ, ब व क हे अधिक प्रमाणात असते. तसेच यातून पोषणमूल्ये व खनिजे देखील मिळतात.

Be sure to include these foods in your diet after delivery, Post Delivery Diet, after delivery diet
मायग्रेनच्या रुग्णांनी हे पदार्थ खाणे टाळा, अन्यथा होईल आरोग्यावर परिणाम

२. बाजरी, ज्वारी, नाचणी व गहू यांना मोड आणून त्याचे सेवन करायला हवे. तसेच याचे पीठ तयार करता येईल. व त्याचे सेवन आपण करु शकतो.

३. बदामात अनेक पोषक घटक आहेत. यात अधिक पोषणमूल्य आणि जीवनसत्त्व आढळते त्यासाठी याचे सेवन फायदेशीर ठरेल.

४. मेथीचे दाणे किंवा त्याच्या भाजीचे सेवन आवश्य करावे. मेथीत अनेक पोषण तत्वे आढळून येतात. शरीरात ऊर्जा वाढवण्यासाठी त्याचा अधिक फायदा होऊ शकतो.

५. तसेच आहारात हिरव्या भाज्या व लिंबूवर्गीय फळांचा समावेश करु शकतो. यामुळे प्रतिकारशक्ती अधिक मजबूत होईल. यातून अधिक लोह प्राप्त होईल.

६. आपण आहारात अंडीचा समावेशही करु शकतो. अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे. यातून बाळाला आईच्या दूधामार्फत अनेक पोषण तत्वे मिळू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com