Brain Seizure First Aid : अचानक मिर्गी आल्यानंतर काय कराल ? जाणून घ्या उपाय

मिर्गीचा दोहरा हे नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल. या रोगामध्ये माणसाच्या मस्तिष्कमध्ये प्रॉब्लेम होतो.
Brain Seizure First Aid
Brain Seizure First AidSaam Tv
Published On

Brain Seizure First Aid : मिर्गीचा दोहरा हे नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल. या रोगामध्ये माणसाच्या मस्तिष्कमध्ये प्रॉब्लेम होतो. त्याच्या डोक्यामध्ये असलेले सेल्स काम करत नाही. ज्यामुळे माणसाला झटके येतात.

अशा व्यक्तींमध्ये अनेक प्रकारच्या समस्या दिसून येतात. काही लोक बेशुद्ध पडतात. तर काही लोक वेगळ्या पद्धतीने रिऍक्ट करतात. तुम्हाला तुमच्या आसपास कधीही आणि कुठेही अशा पद्धतीचा रुग्ण आढळून आला तर तुम्ही त्याची कशा पद्धतीने मदत कराल. याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

Brain Seizure First Aid
World Brain Day: ब्रेन स्ट्रोकची लक्षणे व धोक्याविषयी जाणून घ्या

अचानक मिर्गी आल्यानंतर काय कराल ?

डोक्यावर परिणाम झालेल्या व्यक्तीसोबत तोपर्यंत रहा जोपर्यंत तो व्यवस्थित बरा होत नाही. माणूस व्यवस्थित झाल्यावर त्याला सुरक्षित जागेवर बसण्यासाठी मदत करा. जेव्हा ते शुद्धीवर येतील आणि व्यवस्थित बोलायला लागतील. तेव्हा त्यांना त्यांच्यासोबत काय झाले होते हे अगदी सहज भाषेत सांगा.

या गोष्टींची देखील काळजी (care) घ्या :

1. स्वतःला आणि समोरच्या व्यक्तीला शांत ठेवा.

2. पीडित व्यक्तीला त्याच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करा.

3. त्या व्यक्तीला खाली जमिनीवर झोपवा.

4. पीडित व्यक्तीला आराम करण्यासाठी एका अंगावर झोपण्यास सांगा, असं केल्याने त्याला श्वास घ्यायला अडथळा निर्माण होणार नाही.

Brain Seizure First Aid
Brain Seizure First AidCanva

5. पीडित व्यक्तीच्या आसपास तीक्ष्ण वस्तू असतील तर त्या बाजूला काढा. यामुळे त्यांना लागण्यापासून वाचवले जाऊ शकते.

6. त्यांच्या डोक्याखाली सॉफ्ट किंवा सपाट वस्तू ठेवा.

7. त्यांनी चष्मा घातला असेल तर त्यांचा रस्मा काढून बाजूला ठेवा.

8. त्यांच्या गळ्याजवळ कोणतीही अशी गोष्ट ठेवू नका जेणेकरून त्यांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होईल. त्यांनी टाय घातली असेल तर त्यांची टाय लूज करा.

9. व्यक्तीला खालच्या बाजूने पकडा किंवा त्यांच्या कंपन होणाऱ्या शरीरावर ताबा कसा मिळवता येईल याचा प्रयत्न करा.

10. व्यक्तीच्या तोंडामध्ये काहीही टाकू नका. नाहीतर त्यांच्या दातांना किंवा जबड्याला इजा पोहोचू शकते.

11. तोंडा मार्फत श्वास देण्याचा प्रयत्न करू नका. डोक्यावरती परिणाम झाल्यानंतर लोक त्यांचे तेच श्वास घेण्यास सुरू करतात.

12. जोपर्यंत व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर येत नाही. तोपर्यंत त्याला काहीही खायला (Food) प्यायला देऊ नका.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com