Genetic Diabetes : आई-वडिलांना मधुमेह आहे, याचा तुम्हाला धोका किती? जाणून घ्या, तज्ज्ञांचे मत

जर पालकांना मधुमेह असेल तर मुलाला मधुमेह होण्याचा धोका असतो.
Genetic Diabetes
Genetic Diabetes Saam Tv

Genetic Diabetes : जर पालकांना मधुमेह असेल तर मुलाला मधुमेह होण्याचा धोका असतो. यावर तज्ज्ञांचे मत काय आहे आणि हा धोका कसा कमी करता येईल हे जाणून घेऊया.

मधुमेहाबाबत लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात. बोलक्या भाषेत आपण मधुमेहाला साखर या नावाने ओळखतो. लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न पडतो की, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला किंवा आई-वडिलांना मधुमेह असेल, तर मुलाला या आजाराचा धोका किती आहे.

आरोग्य तज्ज्ञ आणि संशोधनानुसार, जर पालकांपैकी एकाला टाइप 2 मधुमेह असेल तर मुलामध्ये हा आजार होण्याचा धोका 4 पटीने वाढतो. दुसरीकडे, जर दोन्ही पालकांना टाइप 2 मधुमेह असेल तर मुलामध्ये मधुमेहाचा धोका 50% वाढतो. याचे कारण पालकांकडून मिळालेली जीन्स आहे.

Genetic Diabetes
Diabetes Home Remedies : मधुमेहींनो, रक्तातील साखर सतत वाढते? 'हे' घरगुती उपाय करुन पाहा

टाइप 1 मधुमेह अनुवांशिक आहे -

मधुमेहाचे दोन प्रकार आहेत, पहिला प्रकार एक आणि दुसरा प्रकार दोन. टाइप वन डायबिटीज हे बहुधा आनुवंशिकतेमुळे होते. म्हणजेच जर पूर्वी आई-वडील, आजी-आजोबांना साखरेचा त्रास झाला असेल, तर मुलामध्ये टाईप वन मधुमेहाचा धोकाही वाढतो.

टाईप वन डायबिटीजची समस्या जन्मापासूनच मुलामध्ये दिसून येते. कारण अनुवांशिक कारणांमुळे स्वादुपिंडात इन्सुलिनचे उत्पादन थांबते.

टाइप 2 मधुमेह खराब जीवनशैलीमुळे होतो -

जगभरातील मधुमेहाच्या एकूण प्रकरणांपैकी 90% प्रकरणे टाइप टू मधुमेहाची आहेत. संशोधन असे सूचित करते की जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला टाइप 2 मधुमेह असेल तर तो मुलाला देखील होऊ शकतो.

यामध्ये जीन्सचाही महत्त्वाचा वाटा आहे. त्याच वेळी, खराब जीवनशैलीमुळे, टाइप 2 मधुमेह देखील होतो. कौटुंबिक इतिहासाव्यतिरिक्त, टाइप 2 मधुमेह या कारणांमुळे होऊ शकतो.

Genetic Diabetes
Diabetic Patients : मधुमेहांच्या रुग्णांनी गरम पाण्याने आंघोळ केल्यास पडू शकते भारी; जाणून घ्या, त्याचे कारणे
  • वजन जास्त असणे

  • व्यायाम न करणे

  • रक्तातील चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे

  • उच्च रक्तदाबाची

  • महिलांमध्ये पीओएसची समस्या

मधुमेहाचा धोका कसा कमी करता येईल -

कारण टाईप वन डायबिटीज हा बहुधा आनुवंशिकतेमुळे होतो, अशा परिस्थितीत हा आजार पूर्णपणे रोखता येत नाही, पण त्याचा धोका नक्कीच कमी करता येतो.

  • नवजात बालकाला किमान 6 महिने फक्त आईचे दूध पाजावे

  • बाळाला वेळोवेळी लसीकरण करून घ्या आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्या

  • बाळाला संसर्गापासून वाचवा आणि त्याची विशेष काळजी घ्या. तसेच गरोदरपणात महिलांनी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी जेणेकरून नवजात बाळाला साखरेचा त्रास होऊ नये आणि निरोगी जन्म घेता येईल.

टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जीवनशैली बदलणे. आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करा आणि नियमित व्यायाम करा. चांगला आहार आणि व्यायाम टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करू शकतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com