Urticaria : शीतपित्त म्हणजे काय? अंगावर पित्त का उठते? जाणून घ्या, कारणे, लक्षणे आणि उपचार

अंगावर पित्त उठणे या समस्येला ‘शीतपित्त’ असे म्हणतात.
Urticaria
Urticaria Saam Tv
Published On

Urticaria : शीतपित्ताचा त्रास अनेकजणांना असतो. यामध्ये अंगावर खाज सुटते व त्वचेवर (Skin) पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या गांधी काहीवेळाने कमी होतात.

मात्र परत परत हा त्रास होत असतो. या त्रासाला शीतपित्त या नावानेसुध्दा ओळखले जाते. ऍलर्जीमुळे अंगावर असे पित्त उठत असते. अंगावर पित्त का येते व अंगावर पित्त उठणे यावरील उपाय याची माहिती सांगितली आहे.(Health)

शीतपित्त म्हणजे काय?

अंगावर पित्त उठणे या समस्येला ‘शीतपित्त’ असे म्हणतात. प्रामुख्याने थंड हवामानात जास्त प्रमाणात अंगाला पित्त उठत असल्याने या समस्येला 'शीतपित्त' असे नाव दिलेले आहे. शीतपित्ताला आधुनिक वैद्यकीय भाषेत अर्टिकेरिया असे म्हणतात तर बोलीभाषेत 'अंगावर पित्त उठणे' असे म्हंटले जाते

Urticaria
Headache And Acidity : 'या' 5 पदार्थांनी नैसर्गिकरित्या डोकेदुखी व अपचनाची समस्या मिनिटांत होईल दूर !

अंगावर पित्त उठण्याची कारणे -

प्रामुख्याने ऍलर्जीमुळे अंगावर पित्त येते. ज्या पदार्थाची ऍलर्जी (वावडे) आहे, अशा पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेतील विशिष्ट पेशींमधून हिस्टामाइन नावाचा पदार्थ स्रवतो. त्याचा परिणाम म्हणून त्वचेला खाज येते व त्वचेवर लालसर पित्ताच्या लहानलहान सुजयुक्त चकते उठतात.

कशामुळे अंगावर पित्त येते ?

  • कोणकोणत्या पदार्थांमुळे ऍलर्जी होऊन अंगावर पित्त उठू शकते याची माहिती खाली दिली आहे.

  • काही जणांना विशिष्ट पदार्थ खाल्यानंतर असा त्रास होऊ लागतो. यामध्ये अंडी, शेंगदाणा, काजू, मासे, शेलफिश, मांसाहार, स्ट्रॉबेरी, गहू, हरभरा डाळ, तूर डाळ वैगेरे खाद्यपदार्थ यापैकी कशाचीही ऍलर्जी असू शकते. असा पदार्थ खाण्यात आल्यास त्यांच्या अंगावर पित्त उठते.

  • विशिष्ट औषधे घेत असल्यासही असा त्रास होऊ शकतो. यामध्ये अँटीबायोटिक्स किंवा वेदनाशामक औषधे यांची ऍलर्जी असू शकते. घरातील कुत्री, मांजरी, घोडे इत्यादी पाळीव प्राण्यांच्या केसांची ऍलर्जी असल्यास त्यामुळे अंगावर पित्त उठू शकते.

  • थंड वातावरण, थंड पदार्थ यामुळे अंगावर पित्त उठू शकते.

  • सूर्यप्रकाश, उष्ण वातावरण, उष्ण पदार्थ यांची ऍलर्जी असल्यास त्यामुळेही अंगावर पित्त येते.

  • धूळ, धूर, हवेतील प्रदूषण, परागकण, केमिकल्स यांच्या संपर्कात आल्यामुळे, टेरेलीन, टेरीकाट अशा कपडांची ऍलर्जी असल्यास शितपित्त होऊ शकते.

  • तसेच पोटामध्ये कृमी व जंत झाल्याने, कीटक चावल्याने किंवा सर्दीसारखे इन्फेक्शन झाल्यामुळेही अंगावर पित्त उठू शकते.

Urticaria
Folic acid benefits : गर्भावस्थेत फॉलिक अॅसिड अधिक गरजेचे का असते ?

शीतपित्ताची लक्षणे -

  • अंगावर खाज येणे, अंगावर पित्त उठणे, त्वचेवर सूज असणाऱ्या लालसर गांधी किंवा चकते उठणे अशी लक्षणे शीतपित्तामध्ये असतात.

  • या त्रासात आलेल्या पिताच्या गांधी व अंगाला होणारी खाज काहीवेळात आपोआप कमी होत असतात. मात्र पुन्हा ऍलर्जी असणाऱ्या पदार्थाच्या संपर्कात आल्यास पुन्हा अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्त उठते.

  • शीतपित्त किंवा अंगावर पित्त येणे हा त्रास एखाद्या पदार्थाच्या ऍलर्जीमुळे होत असतो. त्यामुळे नेमक्या ऍलर्जीचा ट्रिगर ओळखून त्यापासून दूर राहिल्यास हा त्रास दूर होत असतो. म्हणजे जर एखाद्यास शेंगदाणे खाल्ल्यानंतर असा त्रास होत असल्यास, त्याने शेंगदाणे खाणे बंद केल्यास हा त्रास होणे थांबते. यासाठी नेमकी कशाची ऍलर्जी आहे ते ओळखणे शीतपित्तामध्ये आवश्यक असते.

  • यासाठी तुम्ही एक लिस्ट बनवू शकता. त्यामध्ये तुम्ही रोज घेत असलेल्या सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची नावे लिस्टमध्ये लिहा. त्यानंतर कोणता पदार्थ खाल्यावर त्रास होतो हे

  • आपल्या निरीक्षणातून ओळखणे सोपे जाईल. खाद्यपदार्थांची ऍलर्जी नसल्यास ऊन, उष्ण किंवा थंड वातावरण, कपडे, घरातील पाळीव प्राणी यापैकी कशाची ऍलर्जी आहे ते ही निरीक्षणातून ओळखू शकता.

काही जणांना हा त्रास अनेक महिने ते अनेक वर्षेही होऊ शकतो. अनेकजण शीतपित्त उपचारासाठी अँटी-हिसटामीन औषधे घेतात. अशा औषधामुळे खाज तात्पुरती कमी होते मात्र पुन्हा शीतपित्ताचा त्रास उदभवतो. बहुतांशी लोक अंगावर गांधी उठून खाज सुरू झाली की सेट्रीझिन किंवा Ebastine अशा गोळ्या घेतात.

याने खाज थांबते आणि तात्पुरते बरे वाटते; पण या औषधांचे दीर्घकालीन दुष्परिणामही अधिक आहेत. कारण या औषधांच्या अधिक सेवनामुळे शरीरातील सर्व स्राव अचानक शोषल्यासारखे होतात. तोंड, घसा कोरडा पडतो. झोप जास्त लागते. किडनीचे आजार उदभवतात म्हणून या आजारावर अशा गोळ्या घेऊन तात्पुरता उपचार करण्याऐवजी याला मुळापासून बरे केले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com