Headache And Acidity : 'या' 5 पदार्थांनी नैसर्गिकरित्या डोकेदुखी व अपचनाची समस्या मिनिटांत होईल दूर !

बदलते हवामान, ताण-तणाव, झोपेत व्यत्यय आणि अगदी पचनाच्या समस्यांमुळे तीव्र डोकेदुखी होऊ शकते.
Headache And Acidity
Headache And AciditySaam Tv
Published On

Headache And Acidity : डोकेदुखी आणि अपचनाचा त्रास हल्ली प्रत्येकामध्ये दिसून येत आहे. बदलते हवामान, ताण-तणाव, झोपेत व्यत्यय आणि अगदी पचनाच्या समस्यांमुळे तीव्र डोकेदुखी होऊ शकते.

मायग्रेन आणि सायनससारख्या शरीरातील समस्यांवर लक्ष केंद्रित करणारे डोकेदुखीचे विविध प्रकार आहेत. जेव्हा डोकेदुखी होते तेव्हा गोळ्या आणि इतर प्रकारच्या औषधांचा अवलंब करता येत नाही.

डोकेदुखीसाठी (Headache), विशेषत: उन्हाळा आणि पावसाळ्यात आणि अॅसिडिटीसाठी काय करायला हवे हे ऋतूजा दिवेकरने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर काही टिप्स सूचीबद्ध केल्या आहेत, ज्या नैसर्गिकरित्या वेदना कमी करण्यास मदत करू शकतात. डोकेदुखी आणि अॅसिडिटीसाठी या टिप्स असल्या तरी बदलत्या हवामानासाठी त्या पुरेशा प्रमाणात काम करू शकतात. (Latest Marathi News)

1. मटक्याचे पाणी प्या

Drink Water
Drink WaterSaam Tv

भरपूर पाणी (Water) पिणे महत्वाचे आहे कारण ते शरीराचे कार्य सुरळीत करते. पाणी प्यायल्याने अपचनाची समस्या दूर होऊन डोकेदुखीवर आराम मिळतो.

2. कोकम शरबत

Kokum Juice
Kokum JuiceCanva

कोकम हे असे फळ आहे जे स्थानिक स्तरावर अॅसिडिटीसाठी रामबाण इलाज म्हणून ओळखले जाते. ती सांगते दुपारच्या जेवणाच्या काही तास आधी भिजवलेल्या सब्जाच्या बिया एक ग्लास कोकम सरबत पिण्याचा सल्ला तिने दिला आहे. हे पेय दिवसभर आपल्याला हायड्रेट देखील ठेवेल.

3. दही भात

Rice and Yogurt
Rice and YogurtCanva

डोके दुखत असेल तर दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात पर्यायी म्हणून आपण जेवणात दही आणि भाताचा समावेश करु शकतो. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. तसेच हे उत्तम प्रोबायोटिक अन्नपदार्थ आहे.

4. गुलकंद दूध

Gulkand Milk
Gulkand MilkCanva

गुलकंदमध्ये विविध अँटिऑक्सिडंट असतात आणि ते त्वचा आणि केसांसाठी टवटवीत करणारे म्हणून काम करतात. दुधात मिसळून गुलकंद खाल्ल्यास शांत झोप येते. हे डोकेदुखीसाठी एक नैसर्गिक शीतलक देखील आहे.

5. फळे

Fruits
FruitsCanva

डोकेदुखी व अपचनाचा त्रास होत असेल तर हंगामी फळांचे सेवन फायदेशीर ठरेल. फळे हे मज्जातंतूंना शांत करते आणि दीर्घकाळ ऊर्जा प्रदान करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com