What Is Cancer: जीवघेणा कॅन्सर नेमका काय? 5 प्रकार; सर्वाधिक महिला रूग्ण भारतात, कारण काय?

What Is Cancer : कर्करोग हा जीवघेणा आजार आहे. कर्करोग आजारावर येत्या वर्षात लस येणार असल्याचे रशियाने सांगितले आहे. तर हा आजार नेमका काय आहे? तो कसा होतो? याबाबत सर्व माहिती जाणून घ्या.
What Is Cancer
What Is CancerSaam Tv
Published On

संपूर्ण देशात कॅन्सरचे रुग्ण वाढत आहे. भारतात तर सर्वाधिक महिला या कॅन्सरच्या बळी आहे. कॅन्सरवर लवकरच लस येणार आहे. रशियाने याबाबत मोठी घोषणा केली आहे. रशिया पुढच्या वर्षी कॅन्सरवर लस आणणार असल्याचे सांगितले आहे. तर कर्करोग नक्की आहे तरी काय? त्याची लक्षणे काय? प्रकार किती? याबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात.

What Is Cancer
Pancreatic cancer: अचानक वजन कमी होत असेल तर सावध व्हा! काय आहेत स्वादुपिंडाच्या कॅन्सरची लक्षणं, तज्ज्ञांनी दिली माहिती

कॅन्सर नक्की आहे तरी काय? (What is Cancer)

कॅन्सर हा शरीरातील अनियंत्रित पेशींमुळे उद्भवणारा रोग आहे. दोनशेपेक्षा जास्त कॅन्सरचे प्रकार आहे. आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवांमध्ये किंवा उतीमध्ये हा आजार होऊ शकतो. आपल्या शरीरात आवश्यकतेनुसार नवीन पेशी तयार होतात. या पेशी जुन्या पेशींच्या जागा घेतात. परंतु अनेकदा गरज नसतानाची जास्त पेशी वाढतात. या पेशींची गाठ तयार होते. त्याला ट्युमर असे म्हणतात.या गाठी कॅन्सरच्या असतात. त्यामुळे शरीरात कॅन्सर होतो आणि तो परसत जातो.भारतात सर्वाधिक या ५ प्रकारच्या कॅन्सरचे रुग्ण आहे.

कॅन्सरच्या सर्वाधिक महिला रुग्ण भारतात (India Has Highest Women Patient Of Cancer)

सर्वाधिक कॅन्सर रुग्ण असणाऱ्यांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक येतो.भारतात सर्वाधिक महिला या कॅन्सर रुग्ण आहेत. भारतात ५० वर्षांपेक्षा लहान वयोगटातील महिलांना कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढते.

स्तनाचा कॅन्सर (Breast Cancer)

महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर सर्वाधिक वाढतो. स्तनाचा कॅन्सर होण्याची कारणे म्हणजे उशीरा लग्न, मुलांचा जन्म. यामुळे स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीचादेखील आपल्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे कॅन्सर कदाचित होऊ शकतो.

तोंडाचा कॅन्सर (Oral Cancer)

भारतात सर्वाधिक तोंडाच्या कॅन्सरचे रुग्ण आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे दारु, गुटखा, तंबाखू, पान मसाला. यामुळे तोंडाचा कॅन्सर उद्भवतो.

What Is Cancer
Cancer Vaccine: कॅन्सरवर आली लस, रशियाचा दावा; नागरिकांना कधीपासून मिळणार फ्री?

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer)

ग्रामीण भागातील महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे रुग्ण आहेत. अस्वच्छता, चांगल्या मेडिकल सुविधा नसल्यामुळे हा कर्करोग होतो. तसेच लैंगिक संबंध, HPV इन्फेक्शन यामुळेदेखील हा कर्करोग होऊ शकतो.

फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer)

फुफ्फुसाचा कर्करोग हा धुम्रपानाच्या सवयींमुळे होतो. महिला व पुरुषांमध्ये हा कर्करोग होतो.त्याचसोबत वाढत्या प्रदूषणामुळेही फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. परंतु सध्या धूम्रपान करत नसलेल्या लोकांनाही हा कर्करोग होत आहे.

कोलोरेक्टल कॅन्सर (Colorectal Cancer)

कोलोरेक्टल कॅन्सर हा आतड्याच्या कोलन किंवा गुदाशयात सुरु होणारा कर्करोग आहे.चुकीची जीवनशैली, लठ्ठपणा आणि अनुवंशिकतेमुळे हा कॅन्सर होऊ शकतो.

What Is Cancer
Cancer Vaccine : कॅन्सरवरील लस आली रे.... ट्युमर रोखण्यास होणार मदत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com