Period Flu Symptoms : पिरीयड फ्लू म्हणजे नेमकं काय? तज्ज्ञांनी सांगितलं 'या' समस्येमध्ये महिलांना नेमकं काय होतं?

Period Flu Symptoms : मासिक पाळीत पोटदुखी, क्रॅम्प्स, मूड बदलणं, थकवा, चिडचिड, राग, ताप यांसारख्या समस्या सामान्य मानल्या जातात. मात्र पिरीयड फ्लू म्हणजे काय तुम्हाला माहितीये का?
Period Flu Symptoms
Period Flu Symptomssaam tv
Published On

दर महिन्याला महिलांना मासिक पाळीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. दर महिन्याला ३ ते ५ दिवसांपर्यंत सुरु असणाऱ्या या चक्रावेळी महिलांना अनेक वेदना होतात. मासिक पाळीत पोटदुखी, क्रॅम्प्स, मूड बदलणं, थकवा, चिडचिड, राग, ताप यांसारख्या समस्या सामान्य मानल्या जातात. केवळ एक महिला नाही तर शेकडो महिलांना मासिक पाळीदरम्यान अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

यावेळी बहुतेक महिलांना याची जाणीव नसते की, हा त्रास का होतोय? या प्रकारच्या समस्येचं मुख्य कारण म्हणजे पीरियड फ्लू. बहुतेक महिलांना पीरियड फ्लू या शब्दाची माहितीही नसते. आज आपण जाणून घेऊया की, पीरियड फ्लू म्हणजे काय, त्याची लक्षणे काय आहेत.

वाशीच्या हिरानंदानी रूग्णालयातील स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. सोनम तिवारी म्हणाल्या की, मासिक पाळी हे एक हार्मोनल चक्र असून ज्यामध्ये मुख्य हार्मोन्स इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचा समावेश होतो. "पीरियड फ्लू" म्हणजे चक्कर येणं, थकवा, डोकेदुखी, पोट फुगणं आणि मूड बदलणं यांसारख्या समस्या उद्भवणं. ही लक्षणं प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम (PMS) शी संबंधित आहेत, जरी अनेक लोकांना 'पीरियड फ्लू' या शब्दाची माहिती नसते. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, पीरियड फ्लूचा इन्फ्लूएंझा किंवा सामान्य फ्लूशी संबंध नाही. खरं तर, हे पीएमएस लक्षणांसाठी एक शब्द म्हणून वापरला जातो.

मासिक पाळीची लक्षणं नियंत्रित करण्यासाठी काही घरगुती उपाय केले जाऊ शकतात. यामध्ये संतुलित आहार घेणं, नियमित व्यायाम करणं किंवा वेदना कमी करण्यासाठी हॉट वॉटरबॅग वापरणं. शिवाय यावेळी पनेकिलर देखील उपयुक्त ठरू शकतात. परंतु स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घेणं योग्य आहे, असंही डॉ. सोनम तिवारी यांनी सांगितलंय.

पीरियड्स फ्लूची लक्षणं काय दिसून येतात?

  • अतिसार

  • पोट बद्धकोष्ठता

  • चक्कर येणं

  • मळमळ वाटणं

  • थकवा

  • डोकेदुखी

  • क्रॅम्प्स येणं

  • पायांना सूज येणं

  • डोकेदुखी

  • स्तनांमध्ये वेदना

पिरीयड्स फ्लूसाठी घरगुती उपाय

  • या काळात दही आणि हिरव्या पालेभाज्या यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ जरूर खा.

  • अल्कोहोल, कॅफिन आणि तंबाखू यांचं सेवन टाळा.

  • भरपूर पाणी प्या

  • हलका व्यायाम करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com