मृत्यूनंतर शरीर पुन्हा जिवंत होऊ शकते का? विज्ञान काय म्हणते?

यूनिवर्सल फेनोमिना ऑफ एंट्रॉपी ही एक प्रक्रिया आहे.
मृत्यूनंतर शरीर पुन्हा जिवंत होऊ शकते का? विज्ञान काय म्हणते?
मृत्यूनंतर शरीर पुन्हा जिवंत होऊ शकते का? विज्ञान काय म्हणते?
Published On

शरीर अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेने बनले आहे, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की, असे नक्की काय घडते ज्यामुळे आपले शरीर मृत (Dead body) मानले जाते? शाळेपासून, आपण अनेक विज्ञान पुस्तकांमध्ये पेशी (Muscle) आणि या पेशींच्या प्रक्रिया आपल्याला जीवन कसे देतात, याबद्दल आपण वाचले आहे. पण तत्पुर्वी आपण आपले शरीर जिवंत कसे राहते, याबद्दल माहिती करुन घेऊ.

हे देखील पहा-

शरीर कसे टिकते?

मानवी शरीर जैविक प्रक्रियेमुळे कार्य करते. यासाठी सेलची रचना आणि कार्यप्रणाली समजून घेणे आवश्यक आहे. रासायनिक प्रतिक्रिया सर्व पेशींमध्ये सतत चालू असतात. या रासायनिक अभिक्रियांमध्ये एटीपी नावाची ऊर्जा मदत करते. हा एटीपी आपल्या शरीरातील ऑक्सिजन आणि ग्लुकोजच्या परस्पर अभिक्रियांद्वारे बनते. आता शरीरातील पेशी या एटीपीचा उपयोग शारीरीक वाढीसाठी, दुरुस्तीसाठी आणि पुनरुत्पादन अशा या सर्व कामात केला जातो. शरीरातील या आवश्यक रेणूंच्या निर्मितीपेक्षा या रेणूंना योग्य ठिकाणी नेण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च होत असल्याचे तज्ञ सांगतात.

मृत्यूनंतर शरीर पुन्हा जिवंत होऊ शकते का? विज्ञान काय म्हणते?
झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त? 10-3-2-1 ट्रिक त्वरित करेल मदत

यूनिवर्सल फेनोमिना ऑफ एंट्रॉपी ही एक प्रक्रिया आहे. याचा अर्थ असा की, रेणू स्वतः उच्च एकाग्रता क्षेत्रापासून कमी एकाग्रता क्षेत्राकडे जातात आणि नष्ट होऊ लागतात. म्हणूनच पेशींसाठी एटीपीमधून ऊर्जा वापरून एन्ट्रॉपी राखणे खूप महत्वाचे आहे. हे आतल्या रेणूंना त्यांच्या गुंतागुंतीच्या संरचनेत राहू देते. यामुळे जैविक प्रक्रिया नीट पार पडते.परंतु जेव्हा पेशी एन्ट्रॉपी गमावतात आणि त्यांची देखभाल करू शकत नाहीत, तेव्हा जैविक प्रक्रिया अपयशी ठरते. परिणामी शरीराचा मृत्यू होतो.

हेच कारण आहे की मृत शरीर जिवंत केले जाऊ शकत नाही, कारण शरीरासाठी आवश्यक पेशीच मृत झालेल्या असतात आणि जटिल संरचना संपून गेलेल्या असतात. आतापर्यंत अस्तित्वात असलेले सर्व वैद्यकीय शोध काही काळासाठी मृत्यू रोखू शकतात, परंतु मृत शरीर पुन्हा जिवंत करु शकत नाहीत. त्यामुळे कोणत्याही रोगावर वेळेवर उपचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते, या उपचारामध्येरोग किंवा आजारामुळए झालेली प्रक्रिया सुधारली जाऊ शकते. गेल्या काही वर्षांपर्यंत कोमाला जाण्याच्या स्थितीला मृत मानले जात होते, परंतु आता वैद्यकीय शास्त्रामुळे आता कोमात गेलेल्या व्यक्तीवर उपचार केले जाऊ शकतात. त्यानंतरही एखादी व्यक्ती जिवंत असू शकते.

मृत व्यक्ती जिवंत होऊ शकते का?

आता प्रश्न येतो की ज्याला मृत घोषित केले गेले आहे तो पुन्हा जिवंत होऊ शकतो का? आतापर्यंत असा शोध यशस्वी झाला नाही. परंतु निसर्गातून प्रेरणा घेऊनच विज्ञान नवीन शोध लावते, कारण निसर्गाच्या काही जीवांमध्ये आयुष्य वाढवण्याची क्षमता असते. असे अनेक जीव पृथ्वीवर आढळतात, जे अत्यंत थंडीत स्वतच्याशरीराची जैविक प्रक्रिया गोठवून ठेवू शकतात. अशा वैद्यकीय शास्त्रज्ञदेखील आजारी व्यक्तीचे शरीर असे काहीतरी गोठवून त्यास जिंवत ठेवता येऊ शकते का, याबाबात अनेक प्रयोग सुरु आहेत. जेणेकरून नवीन आविष्कारांनंतर, रोगांवर मात करुन त्या व्यक्तीला पुन्हा एक नवीन जीवन परत देता येऊ शकेल. पण हे शक्य आहे का? याचं उत्तर आहे, होय! वास्तविक यामागे विज्ञान आहे, जे ऐकण्यात चमत्कारापेक्षा कमी नाही.

जर पेशी गोठलेल्या राहिल्या तर रासायनिक प्रतिक्रिया थांबेल आणि पेशींचा प्रसार होणार नाही. याचा अर्थ असा की पेशी नष्ट होणार नाहीत. जरी सेल सिस्टीम पूर्णपणे नष्ट केली गेली असली तरीही, नॅनोबॉट्सच्या मदतीने एटीपी इंजेक्शन देऊन त्यांची पुन्हा निर्मिती केली जाऊ शकते. हे सर्व पाहता, जीवन ही कोणतीही जादू नाही, परंतु एक अतिशय जटिल आणि स्वतःला योग्य क्रमाने लावण्याची प्रक्रिया आहे. मृत्यू म्हणजे फक्त एन्ट्रॉपीमध्ये वाढ. यामुळे शरीराचे नाजूक संतुलन बिघडते. म्हणून असे म्हणता येईल की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू आपण एन्ट्रॉपीची क्रिया किती प्रमाणात उलटवू शकतो यावर अवलंबून आहे.

Edited By- Anuradha

(टिपः येथे प्रदान केलेली माहिती ही केवळ शिक्षणाच्या उद्देशाने दिली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com