Weight Loss पासून ते Cholesterol नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहे स्वयंपाकघरातील हा मसाला, आहारात करा नियमित वापर

Home Remedies For Weight Loss : वाढते वजन आणि कोलेस्टेरॉलच्या समस्येपासून अनेकजण त्रस्त आहेत. वाढत्या वजनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो ज्याचा आपल्याला चांगला परिणाम देखील पाहायला मिळतो.
Home Remedies For Weight Loss
Home Remedies For Weight Loss Saam tv
Published On

Cinnamon Water Benefits :

वाढते वजन आणि कोलेस्टेरॉलच्या समस्येपासून अनेकजण त्रस्त आहेत. वाढत्या वजनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो ज्याचा आपल्याला चांगला परिणाम देखील पाहायला मिळतो.

आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत ज्याचा वापर करुन आपण वाढते वजन आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवू शकतो. प्रत्येक भारतीयाच्या स्वंयपाकघरात दालचिनी सहज मिळते. पदार्थाला चव आणण्यापासून ते आरोग्यासाठी (Health) दालचिनी बहुगुणी आहे.

जेवणात याचा वापर केल्याने तुम्हाला अनेक समस्यांपासून आराम मिळेल. दालचिनीमध्ये लोह, प्रथिने, कॅल्शियम, मॅंगनीज, तांबे, जस्त इत्यादी अनेक पोषक तत्वे आढळतात. रोज नियमितपणे दालचिनीचे पाणी प्यायल्यावर तुम्हाला फायदा (benefits) होऊ शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी

मासिक पाळीत स्त्रियांना अधिक त्रास होतो. पोटदुखी किंवा पाठदुखीच्या (Back Pain) समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी दालचिनीचे पाणी प्यायल्याने तुम्हाला फायदा होईल.

Home Remedies For Weight Loss
Mental Health सुधारण्यासाठी नियमित करा ही योगासने, मन राहिल शांत; तणावापासून राहाल दूर

2. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

दालचिनीमध्ये इन्सुलिन कमी करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहाते. तसेच दालचिनीचे पाणी प्यायल्याने भूक नियंत्रित राहाते, पोट दीर्घकाळ भरलेले राहाते.

3. मधुमेहांसाठी फायदेशीर

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनी बहुगुणी आहे. याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी सुधारते.

4. प्रतिकारशक्ती वाढवते

दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. याचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.

Home Remedies For Weight Loss
Weight Loss In Winter : हिवाळ्यात सुटलेलं पोट राहिल नियंत्रणात! असा तयार करा डाएट प्लान

5. हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत करते

दालचिनीचे पाणी प्यायल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. दालचिनीचे पाणी नियमित प्यायल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com