Personality Development Tips : लोकांना इंप्रेस करायचय? तुमच्या या सवयी आजच बदला

Personality Development : काही लोक इतरांना इंप्रेस करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करतात.
Personality Development Tips
Personality Development TipsSaam Tv

Tips For Personality Development : काही लोक इतरांना इंप्रेस करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करतात. पण इतरांना इंप्रेस करण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही गोष्टी अतिशयोक्त करता. यामुळे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात.

अशा लोकांमुळे इंप्रेस होण्याऐवजी लोक दूर राहणे पसंत करतात. जर तुम्हाला इतरांना इंप्रेस करायचे असेल तर तुम्ही येथे दिलेल्या पद्धती देखील वापरून पाहू शकता. यामुळे लोक केवळ तुमच्याकडे आकर्षित होणार नाहीत, तर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये (Career) यशही मिळेल .

Personality Development Tips
Personality Development By Friendship : चांगली मैत्री देखील बदलू शकते तुमचे व्यक्तिमत्व!

यामुळे लोकांमध्ये (People) तुमचा आदरही वाढेल. तुमचे व्यक्तिमत्वही सुधारेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आपण प्रत्येक कठीण परिस्थिती हाताळण्यास सक्षम असाल. त्या गोष्टीतून हुशारीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करू. या पद्धती कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

ड्रेसिंग सेन्स -

तुमचा ड्रेसिंग सेन्स लोकांना खूप इंप्रेस करतो. म्हणूनच नेहमी स्वच्छ (Clean) कपडे (Cloths) घाला. तुम्हाला सूट होईल असे कपडे. ज्यामध्ये तुम्हाला आरामदायी आणि आत्मविश्वास वाटतो.

Personality Development Tips
Importance of Personality Development: व्यक्तिमत्व विकास का महत्त्वाचा आहे, जाणून घ्या

देहबोली -

व्यक्तिमत्त्व विकासासाठी देहबोलीचा महत्त्वाचा अर्थ आहे. तुमची बसण्याची आणि चालण्याची पद्धत सुधारा. लोक तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या देहबोलीकडे जास्त लक्ष देतात. यातूनही ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात.

बोलण्याची पद्धत -

तुमची बोलण्याची पद्धत सुधारा. बोलण्यासाठी योग्य शब्द वापरा. कोणाला वाईट वाटू नये या स्वरात बोला. कोणाच्याही मध्ये बोलू नका. विषय सोडून बोलू नका. ज्या गोष्टीबद्दल बोलले जात आहे त्यावर थेट बोला.

Personality Development Tips
Personality Development For Students : दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर मुलांनो करा या गोष्टी... व्यक्तिमत्वात होईल सुधारणा

आत्मविश्वास -

तुमच्या कमकुवतपणाला तुमची ताकद बनवण्याचा प्रयत्न करा. ही गोष्ट तुमचा आत्मविश्वास वाढवते. जेव्हा तुम्ही लोकांशी आत्मविश्वासाने बोलता तेव्हा ते तुमच्यामुळे इंप्रेस होतात.

मदत करणे -

जेव्हा कोणाला तुमच्या मदतीची गरज असेल तेव्हा त्याला नेहमी मदत करा. यामुळे लोकांच्या नजरेत तुमचा आदर वाढतो. तुमच्या मदतीची सवय पाहून लोक इंप्रेस होतात.

Personality Development Tips
Rupali Bhosale | वाऱ्यावर पदर उडाला, सौंदर्याचा चेहरा बहरला

स्वावलंबन -

स्वावलंबी व्हा. आपल्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वतःहून गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला जीवनात यश तर मिळतेच शिवाय लोक तुमच्याशी इंप्रेस होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com