Acne Problem : मुरुमांपासून सुटका हवी आहे ? घरीच बनवा 'हे' 3 स्क्रब

बदलत्या हवामानामुळे तेलकट त्वचेच्या लोकांसाठी अनेक समस्या येतात.
Acne Problem
Acne Problem Saam Tv
Published On

Acne Problem : जेव्हा तुमचा संपूर्ण चेहरा चमकत असतो आणि तुमच्या नाकावरील ब्लॅकहेड्स स्वतंत्रपणे चमकत असतात, तेव्हा परिस्थिती खरोखरच हास्यास्पद होते. वास्तविक, बदलत्या हवामानामुळे तेलकट त्वचेच्या लोकांसाठी अनेक समस्या येतात. प्रदूषणामुळेही (Pollution) त्यांच्या चेहऱ्यावर अनेक समस्या सुरू होतात. त्यापैकी एक म्हणजे ब्लॅकहेड्स. ब्लॅकहेड्स बहुतेकदा नाक आणि हनुवटीभोवती आढळतात. ज्यामुळे संपूर्ण चेहऱ्याच्या सौंदर्यावर डाग पडतो. पण आता काळजी करू नका, कारण त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय करा.

नाकावरील हट्टी ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यासाठी पार्लरमध्ये जाणे ही एक महाग आणि वेदनादायक प्रक्रिया आहे. त्यामुळे तुमच्या मदतीसाठी आम्ही काही घरगुती (Home) स्क्रब घेऊन आलो आहोत. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Acne Problem
Skin Care: थंडीत कोरड्या त्वचेपासून 'अशी' घ्या स्वत:ची काळजी

ब्लॅकहेड्स का होतात?

जेव्हा त्वचेमध्ये सेबम (तेल) जास्त प्रमाणात तयार होते, तेव्हा ब्लॅकहेड्सची समस्या सुरू होते. त्वचेमध्ये तेल ग्रंथी असतात, ज्या त्वचेसाठी सेबम तयार करण्याचे काम करतात. हे सेबम त्वचा संरक्षित आणि ओलसर ठेवण्यास मदत करते, परंतु काहीवेळा त्वचेवर उपस्थित असलेल्या मृत त्वचेच्या पेशी छिद्रे बंद करतात, त्यामुळे तेल त्वचेच्या आत राहते आणि ब्लॅकहेड्स बनवतात.

प्रदूषणामुळे ब्लॅकहेड्सही वाढतात -

जेव्हा आपल्या त्वचेच्या छिद्रांमध्ये तेल आणि मृत त्वचा जमा होते तेव्हा त्यावर काळे डाग दिसू लागतात. अनेकांना ही समस्या शरीराच्या इतर भागांवरही असते. ब्लॅकहेड्स ही मुले आणि मुली दोघांनाही समस्या असू शकते. टीन एजर्समध्ये हार्मोन्समधील बदलांमुळेही ही समस्या उद्भवते. चला तर मग जाणून घेऊया घरगुती उपायांनी या समस्येवर कशी मात करता येईल.

साखर आणि लिंबू स्क्रब -

त्वचेवरील ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी साखर आणि मधाचा स्क्रब फायदेशीर आहे. हे त्वचेतून अतिरिक्त तेल काढते आणि छिद्र उघडण्यास देखील मदत करते.

एका भांड्यात दोन चमचे साखर, एक चमचा मध, अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईल आणि अर्धा चमचा लिंबाचा रस एकत्र करा. आता या मिश्रणाला हलक्या हातांनी सुमारे 3-4 मिनिटे मसाज करा आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.

मध आणि स्ट्रॉबेरी स्क्रब -

मधामुळे बॅक्टेरिया दूर होऊन त्वचा निरोगी होण्यास मदत होते आणि स्ट्रॉबेरीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन-सी त्वचेला आर्द्रता देते. याशिवाय ते स्किन टोन उजळण्याचे काम करते.

एका भांड्यात ३ ते ४ स्ट्रॉबेरी मॅश करा आणि त्यात दोन चमचे मध मिसळा. चेहरा स्वच्छ केल्यानंतर, या स्क्रबला सुमारे पाच मिनिटे मसाज करा आणि 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.

Acne Problem
Winter Skin Care : तुमचीही त्वचा तेलकट आहे? जाणून घ्या हिवाळ्यात कोणते मॉइश्चरायझर्स उत्तम असेल

समुद्र मीठ स्क्रब -

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी समुद्री मीठाचा वापर हा एक चांगला मार्ग आहे. हे त्वचेतील सूज कमी करून ओलावा बनवून देखील कार्य करते.

एका वाडग्यात, दोन चमचे समुद्री मीठ आणि एक चमचा मध चांगले मिसळा. या मिश्रणाने स्वच्छ चेहऱ्यावर सुमारे पाच मिनिटे स्क्रब करा आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com