Skin Glowing : त्वचेवर ग्लो आणायचा आहे ? तर, 'या' फेस पॅकचा वापर करा

तुम्ही इतर फेस पॅकमध्ये टोमॅटोचाही समावेश करून तो चेहऱ्यावर लावू शकता.
Skin Glowing
Skin GlowingSaam Tv
Published On

Skin Glowing : टोमॅटो आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जर तुम्ही रोज टोमॅटोचा लगदा चेहऱ्यावर लावला तर त्वचा निरोगी राहण्यास खूप मदत होते. हवं असल्यास इतर फेस पॅकमध्ये टोमॅटोचाही समावेश करून तो चेहऱ्यावर लावू शकता.

हा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा चण्याच्या पिठात हळद, मध आणि टोमॅटोचा (Tomato) रस मिसळून पेस्ट बनवा. हवं असेल तर या पेस्टमध्ये दहीही घालू शकता. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, सुकल्यानंतर पाण्याने धुवा. यामुळे तुमची त्वचा (Skin) चमकदार होईल.

Skin Glowing
Winter Skin Care : तुमचीही त्वचा तेलकट आहे? जाणून घ्या हिवाळ्यात कोणते मॉइश्चरायझर्स उत्तम असेल

चंदन -

चंदन फेस पॅकमध्येही तुम्ही टोमॅटोचा वापर करू शकता. ते बनवण्यासाठी २ चमचे चंदन पावडरमध्ये टोमॅटोचा रस मिसळून पेस्ट तयार करा. लक्षात ठेवा की ही पेस्ट जास्त जाड नाही. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून वाळल्यानंतर पाण्याने धुवून टाका.

मध -

दोन चमचे मधात टोमॅटोचा लगदा मिसळून मिश्रण तयार करा. आता चेहऱ्यावर मसाज करा, १०-१५ मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा.

दही -

हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्ही एक चमचा दह्यामध्ये टोमॅटोचा रस आणि लिंबाचा रस मिसळा. आता या मिश्रणाने चेहऱ्याला मसाज करा, सुकल्यानंतर तुम्ही ते पाण्याने धुवू शकता.

Skin Glowing
Skin Care: थंडीत कोरड्या त्वचेपासून 'अशी' घ्या स्वत:ची काळजी

हळद -

टोमॅटोच्या लगद्यात एक चमचा हळद मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. वाळल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. यामुळे त्वचा सुधारते, तसेच टॅनिंगपासून बचाव होतो.

मुलतानी माती -

मुलतानी मातीत टोमॅटोचा लगदा मिसळून पेस्ट तयार करा. आता ते चेहऱ्यावर लावा, १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com