Waking Up Till Late Night : तुम्हालाही रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय आहे ? होऊ शकतो का इम्युनिटीवर परिणाम, जाणून घ्या

हिवाळा आला की तापमान घसरते म्हणून सर्दी, खोकल्याचा त्रास सर्वांना होत असतो.
Waking Up Till Late Night
Waking Up Till Late NightSaam Tv

Waking Up Till Late Night : आपल्या इम्युनिटीवर तापमानाचा परिणाम होत असतो त्यामुळे तापमान कमी झाल्यावर प्रतिकारशक्ती पन्नास टक्क्याने कमी होते आणि त्याचा परिणाम नाकावर होतो.

हिवाळा आला की तापमान घसरते म्हणून सर्दी, खोकल्याचा त्रास सर्वांना होत असतो. हा संसर्ग तीव्र गतीने वाढतो.अशा समस्या टाळण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती टिकवणे गरजेचे असते.

Waking Up Till Late Night
Winter Health Immunity : हिवाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खा गरमा गरम गुळ-चपाती, पाहूयात रेसिपी

चांगल्या आरोग्यासाठी (Health) पूर्ण झोप आणि योग्य आहार महत्त्वाचा असतो. त्यामुळे जर पुरेशी झोप घेतली नाही तर प्रतिकारशक्ती कमी होते शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी आणि शारीरिक हालचालीचे पालन केल्याने प्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होते. याबाबत तज्ज्ञांनी आपले मत मांडले आहे. जाणून घेऊया त्याबद्दल

1. प्रश्न: झोपेचा आणि रोगप्रतिकार शक्तीचा संबंध काय आहे? निरोगी व्यक्तीने किती तास झोपावे?

उत्तर- प्रतिकारशक्तीचा आणि झोपेचा जवळचा संबंध आहे कमीत कमी सात ते आठ तास झोपले पाहिजे तुमची झोप पुरी झाली नाही तर इम्युनिटी हळूहळू कमी होत जाते.

2. प्रश्न: चांगल्या रोगप्रतिकारशक्तीसाठी कोणता आहार घेतला पाहिजे?

उत्तर- योग्य आहार घेतल्याने तसेच घरी बनलेले जेवण सर्वोत्तम आहार आहे काहीतरी विशिष्ट पदार्थ खाऊन इम्युनिटी वाढवता येत नाही.

Waking Up Till Late Night
Waking Up Till Late NightCanva

3. प्रश्न: प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करावा?

उत्तर- नियमित योगा (Yoga) करणे किंवा 25 ते 30 मिनिटे चालणे शरीराची हालचाल होईल असा कोणत्याही तुमच्या आवडीचा खेळ खेळणे.

4. प्रश्न: रोजच्या अशा कोणत्या सवय आहेत ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वर परिणाम होतो आणि रोगप्रतिकार शक्ती कमजोर होते?

उत्तर - उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे ,धूम्रपान करणे त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते योग्य आहार (Food) घेऊन तुम्ही प्रतिकारशक्ती वाढवू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com