Vitamin A Deficiency : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्व व खनिजांची अधिक आवश्यकता असते. परंतु, जर आपल्या शरीरात याची मात्रा पुरेशी नसेल तर आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.
हे देखील पहा -
जीवनसत्त्व क आणि ड च्या कमतरेमुळे आपल्याला होणाऱ्या गंभीर आजारांविषयी माहिती आहे परंतु, जीवनसत्त्व अ च्या कमरतेच्या गंभीर परिणामांबद्दल आपल्याला माहित नाही. आपल्याला चांगल्या दृष्टीसोबत, मजबूत प्रतिकारशक्ती, त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी जीवनसत्त्व अ ची अधिक आवश्यक आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, रातांधळेपणा हे जीवनसत्व अ च्या कमतरतेच्या पहिल्या लक्षणांपैकी एक आहे. अधिक गंभीर स्वरूपात, जीवनसत्त्व अ च्या कमतरतेमुळे डोळ्यातील पडदा आणि कॉर्नियाला नुकसान होते. तसेच, अंदाजे २५०,००० ते ५००,०० जीवनसत्त्व अ च्या कमतरतेमुळे मुले दरवर्षी अंध होतात. त्यातील निम्मे अंधत्त्व आल्यानंतर १२ महिन्याच्या आत आपला जीम गमवतात.
जीवनसत्त्व अ शरीराला किती प्रमाणात हवे ?
प्रौढ पुरुषांना ९०० मायक्रोग्राम आणि प्रौढ महिलांना ७०० एमसीजी जीवनसत्त्व अ ची आवश्यक असते. तसेच १ ते ३ वर्षे वयोगटातील मुलांना दररोज २००० IU आणि ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांना ३००० IU जीवनसत्त्व अ ची आवश्यक असते.
जीवनसत्त्व अ च्या कमतरतेमुळे काय होऊ शकते ?
आपले शरीर जीवनसत्त्व (Vitamins) अ च्या गरजा पूर्ण करु शकत नसेल तर आपल्याला डोळ्यांची समस्या उद्भवू शकते. रोग प्रतिकारशक्तीची पातळी कमी होऊ शकते. यामुळे आपल्याला अंधत्व देखील येऊ शकते. जीवनसत्त्व अ च्या कमतरतेमुळे गर्भधारणा व स्तनपानावर देखील नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
त्वचेच्या पेशी तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी जीवनसत्त्व अ आवश्यक आहे. तसेच त्वचेची जळजळ रोखण्यास मदत होते. परंतु जर आपल्या शरीरात जीवनसत्त्व अ ची कमतरता असेल तर आपल्या त्वचेत कोरडेपणा, खाज सुटणे किंवा अगदी स्केलिंगचा अनुभव येऊ शकतो. जीवनसत्त्व अ च्या कमतरतेमुळे खाज देखील होऊ शकतो, अशी स्थिती ज्यामध्ये त्वचेवर (Skin) सूज येते, पुरळ उठते, खवलेले ठिपके आणि फोड येतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.