Vitamins C Benefits : अनेक संसर्गजन्य आजारांवर मात करण्यास उपयुक्त ठरेल जीवनसत्त्व क, जाणून घ्या त्याविषयी

जीवनसत्त्व क चे आपल्या शरीरात किती महत्त्व आहे जाणून घ्या
Vitamin C, Benefits of vitamin c, Health tips
Vitamin C, Benefits of vitamin c, Health tips Saam tv
Published On

Benefits of vitamin c : जीवनसत्त्व क हे शरीरासाठी आवश्यक पोषक आहे. जीवनसत्त्व क हे पाण्यात (Water) विरघळणारे जीवनसत्त्व अन्न व पूरक आहारातून घेतले जाते. जीवनसत्त्व क हे शरीरातील संक्रमण नियंत्रित करण्यासाठी जखमा बरे करण्यासाठी वापरले जाते.

हे देखील पहा -

जीवनसत्त्व क चे कार्य काय आहे?

कोलेजन तयार करण्यासाठी शरीराला जीवनसत्त्व क ची आवश्यकता असते. जो संयोजी ऊतकांचा एक महत्त्वाचा भाग आहे ज्यामध्ये मज्जासंस्था, हाडे, रक्त आणि इतर शरीरातील अवयव समाविष्ट असतात. शरीरात अनेक हार्मोन्स तयार करण्यासाठी जीवनसत्त्व क देखील आवश्यक आहे.

दररोज किती जीवनसत्त्व क आवश्यक आहे?

प्रौढ पुरुषाने दररोज ९० मिलीग्राम जीवनसत्त्व क आणि प्रौढ स्त्रीने ७५ मिलीग्राम जीवनसत्त्व कचे सेवन केले पाहिजे. धूम्रपान करणार्‍यांना इतरांपेक्षा जास्त जीवनसत्त्व क घेणे आवश्यक आहे कारण धूम्रपान केल्याने शरीरातील जीवनसत्त्व क ची पातळी कमी होते.

Vitamin C, Benefits of vitamin c, Health tips
Health food for mood swings : अचानक भूक लागते? मूड खराब झाला आहे? तर या पदार्थांचे सेवन करा मिनिटांत होईल बदल

प्रत्येक लिंबूवर्गीय फळात व भाज्यामध्ये जीवनसत्त्व (Vitamins) क चा चांगला स्त्रोत आहे. सिमला मिरचीमध्ये संत्री आणि लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय पदार्थांमध्ये जास्त जीवनसत्त्व क असते. तसेच जीवनसत्त्व क चे आपण सप्लिमेंट घेत असू तर आपले वजन वाढू शकते. जीवनसत्त्व क सर्व लोकांना आवश्यक आहे. जीवनसत्त्व हे उपयुक्त घटक आहेत जे अवयवांच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com