Mumbai Vada Pav : मुंबईच्या वडापावला मिळाला दक्षिण भारतीय ट्विस्ट! नवा फ्युजन फ्लेवर सोशल मीडियावर चर्चेत

South Indian Twist Vada Pav Recipe : मसालेदार चटण्या आणि कुरकुरीत वड्यांसह मुंबईचा वडा पाव मिळाला नवा साऊथ इंडियन ट्विस्ट. हा फ्युजन फ्लेवर सोशल मीडियावर जोरदार चर्चेत.
Vada Pav Recipe
Vada Pav RecipeSaam Tv
Published On

भारतातील प्रत्येक शहर स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. जसे उत्तर प्रदेश जलेबी-कचोरीसाठी ओळखले जाते, तसेच मुंबईचा वडा पाव हा देशभर लोकप्रिय आहे. वडा पाव हा साधा पण चविष्ट फास्टफूड पदार्थ मानला जातो. शिवाय हा खिशाला परवडणारा असतो. स्ट्रीट फूड प्रेमींसाठी ही खास सोशल मीडियावर चर्चेत असलेली रेसिपी आपण पुढे जाणून घेणार आहोत. कारण, यात मुंबईच्या वड्याचा मसालेदार स्वाद आणि दक्षिण भारतीय स्टाईलचा टच यांचा उत्तम संगम साधला गेला आहे. चहाच्या कपसोबत तर या वड्याची जोडी आणखीच परफेक्ट असेल.

वडा पावसाठी लागणारे साहित्य :

३ मध्यम आकाराचे उकडलेले व मॅश केलेले बटाटे

१ चमचा चिरलेली हिरवी मिरची

१ चमचा चिरलेले आले

पाव चमचा जिरे

पाव चमचा हळद पावडर

चिमूटभर हिंग

Vada Pav Recipe
Monsoon Health : मुलांना सतत सर्दी-खोकला? हा नैसर्गिक उपाय ठरेल सुरक्षित आणि प्रभावी

चवीनुसार मीठ

तळण्यासाठी तेल

कप बेसन

पाव बन्स

हिरवी कोथिंबीर चटणी

चिंचेची चटणी

तळलेल्या हिरव्या मिरच्या

वडापावची रेसिपी

सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, आले आणि हिरवी मिरची टाका. सुगंध येताच मॅश केलेले बटाटे, हळद आणि मीठ घालून व्यवस्थित परता. हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर वड्याचे गोळे तयार करा. आता बेसन, हळद आणि मीठ घालून थोडं घट्टसर पीठ बनवा. वड्याचे गोळे या पिठात बुडवून गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळा. कुरकुरीत वडे तयार झाल्यावर ते पावामध्ये हिरवी व चिंचेची चटणी लावून ठेवा. हा नवा फ्युजन वडा पाव फक्त मुंबईकरांच्याच नव्हे तर फूडीजच्या सगळ्याच चवींचा आनंद दुप्पट करेल.

Vada Pav Recipe
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com