Vi Launches New 4 Plan : Jio आणि Airtelला टक्कर देणार VI, लॉन्च केले 4 जबरदस्त प्लान; अशी आहे ऑफर

Recharge Plans For Year : जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लान आणत आहे.
Vi Launches New 4 Plan
Vi Launches New 4 PlanSaam Tv

Vi New 4 Plans : जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्लान आणत आहे. आता Vi ने दूरसंचार क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी 4 नवीन जबरदस्त प्लान लॉन्च केल्या आहेत.

या प्लानमुळे तुम्हाला संपूर्ण वर्षभराच्या रिचार्जपासून एकाच वेळी सुटका मिळते. म्हणजेच तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करावे लागणार नाही. Vi चा नवीन प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामुळे ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल, अशी कंपनीला आशा आहे.

Jio आणि Airtel ने 5G सेवा सुरू केली आहे तर Vi सध्या 4G नेटवर्कमध्ये आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना रोखण्यासाठी कंपनी (Company) नवनवीन आकर्षक प्लान आणत आहे. नवीन प्लानमध्ये तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी रिचार्ज मिळेल. चला जाणून घेऊया Vi च्या या आकर्षक प्लान्सबद्दल...

Vi Launches New 4 Plan
New Recharge Plan : रिल्स पाहताना लागणार नाही ब्रेक ! 24 रुपयांत 'ही' टेलिकॉम कंपनी देतेय अनलिमिटेड डेटा पॅक

VI चा 2999 रुपयांचा प्लान

ज्या वापरकर्त्यांना कॉलिंगपेक्षा (Calling) जास्त डेटाची गरज आहे त्यांच्यासाठी हा 2999 रुपयांचा प्लान सर्वोत्तम आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना संपूर्ण वर्षासाठी 850 GB डेटा मिळतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबतच दररोज 100 एसएमएसही दिले जातात. एवढेच नाही तर कंपनी या प्लानमध्ये ग्राहकांना Vi Music आणि TV Classic चा अ‍ॅक्सेस देखील देत आहे. तुम्ही प्लानमधील Binge All Night सुविधेचाही लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्ही रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अमर्यादित डेटा मोफत वापरू शकता.

Vi चा रु. 2899 चा प्लान

Vi ने रु. 2899 चा वार्षिक प्लान देखील लॉन्च केला आहे. या प्लानमध्येही कंपनी अनेक ग्राहकांना अनेक उत्तम ऑफर (Offer) देते. या प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना 1.5 जीबी डेटा देते. यामध्ये वापरकर्त्यांना Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights सारखे फायदे मिळतात. या प्लानमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कमध्ये 365 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळतो. Vi रिचार्ज प्लानमध्ये चित्रपट आणि टीव्हीवर VIP प्रवेश देखील देते.

Vi Launches New 4 Plan
Vodafone Idea Recharge : वोडाफोनने लॉन्च केले 3 नवे प्लान ! 17 रुपयांत मिळेल अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा फ्री

Vi चा 1799 रुपयांचा प्लान

Vi चा नवीन आणि शेवटचा 1799 रुपयांचा प्लान (Plan) येतो. या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा फायदा मिळतो. कंपनी या प्लानमध्ये यूजर्सला दररोज 3600 एसएमएस देते. या संपूर्ण प्लानमध्ये यूजर्सना फक्त 24 GB डेटा मिळतो. प्लान 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. Vi च्या या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना Vi Movies चे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com