Health News : वर्टिगो म्हणजे काय ? त्याची लक्षणे कशी असतात

वर्टिगो सामान्य आहे, जगभरातील १० पैकी एकाला त्याच्या आयुष्यात या आजाराचा अनुभव येतो.
Health News
Health NewsSaam Tv
Published On

Health News : वर्टिगो हा एक संतुलन संबंधित आजार आहे, जो सामान्यत: आतील कानाच्या समस्यांमुळे होतो, परिणामी अचानक असह्य संवेदना होतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला जग फिरत आहे असे वाटते. या आजारामुळे शरीराच्या वेस्टिब्युलर प्रणालीमध्ये अडथळा निर्माण होतो, जी अंतर्गत जीपीएस म्हणून कार्य करते आणि संतुलन राखण्यासाठी जबाबदार असते. चेतावणीशिवाय चक्कर येऊ शकते, पडणे आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.

वर्टिगो सामान्य आहे, जगभरातील १० पैकी एकाला त्याच्या आयुष्यात या आजाराचा अनुभव येतो. भारतात (India) वर्टिगोचे प्रमाण जवळपास ०.७१ टक्‍के आहे, म्हणजेच ९ दशलक्षपेक्षा अधिक व्‍यक्‍तींना या आजाराचा त्रास आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ३० टक्‍के व्‍यक्‍तींमध्ये आणि ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ५० टक्‍के व्‍यक्‍तींमध्ये हे सर्वात जास्त दिसून येते. तसेच महिलांना वर्टिगो आजार होण्‍याची शक्यता दोन ते तीन पट जास्त असते.

Health News
Health Tips : Black water आरोग्यासाठी फायदेशीर; बॉलिवूडच्या कलाकारांना याची अधिक पसंती, जाणून घ्या कारण

घराभोवती फिरणे, किराणा सामान खरेदी करणे, कामावर जाणे यांसारखी नित्याची कामे चक्कर आल्याने आव्हानात्मक ठरतात. सामाजिक संवादांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात, या आजाराने प्रभावित व्यक्तींना घरीच राहावे लागते, ज्यामुळे स्वातंत्र्य गमावले जाते आणि चिंता व नैराश्य यांसारखे मानसिक परिणाम होतात.

या आजाराचा धोका सर्वाधिक कोणाला ?

विशेषत: महिलांना (Women) या आजाराचा अधिक त्रास होतो, ज्‍यामुळे चिंता वाढते आणि तणाव हार्मोनच्‍या स्‍तरांवर वाढ होते. ज्‍यामुळे वर्टिगो आजाराचे प्रमाण वाढत जाते. या आजाराचा एखाद्या व्यक्तीच्या कामावर देखील परिणाम होऊ शकतो, परिणामी नोकरी बदलणे किंवा सोडणे, कार्यक्षमता कमी होणे आणि कामाचे दिवस गमावणे अशा परिणामांसह व्‍यक्‍तींवर आर्थिक परिणाम होऊ शकतो.

या आजाराचे प्रमाण जास्त असूनही या स्थितीबद्दल जागरुकतेचा अभाव आहे. सामान्य चक्कर येणे यासारख्या दैनंदिन समस्यांकडे व्यक्ती सहसा दुर्लक्ष करतात, ज्यामुळे प्राथमिक काळजी स्तरावर वर्टिगोचे निदान होणे अवघड जाते. या आजाराची लक्षणे वर्णन व प्रमाणित करणे अवघड आहेत. तसेच मळमळ व उलट्या सारखी लक्षणे इतर स्थितींच्‍या संदर्भात स्‍पष्‍टपणे दिसून येणे अवघड असल्‍यामुळे वर्टिगोचे निदान होणे अवघड ठरू शकते.

वर्टिगोवर फिजिकल थेरपी, आहारातील बदल व जीवनशैलीत फेरबदल, औषधोपचार, मानसोपचार किंवा काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया करून उपचार केले जाऊ शकतात. यामध्ये वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन एक्सरसाइज समाविष्ट आहेत, जे एखाद्याच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून वैयक्तिक उपचारांसाठी सानुकूलित केले जातात. म्हणूनच, लवकर निदान आणि प्रभावी उपचार पर्यायांना मदत करण्यासाठी या आजाराबाबत जागरूकता वाढवण्याची गरज आहे.

Health News
Meditation For Health : मनाला शांत करण्यासाठी 'हे' करा, आरोग्याला होतील अनेक फायदे!

प्रा.डॉ. समीर भार्गव, सल्लागार-पीडी हिंदुजा हॉस्पिटल, माजी अध्यक्ष, असोसिएशन ऑफ ऑटोलॅरिन्गोलॉजिस्ट ऑफ इंडिया म्‍हणाले, वर्टिगोबाबत जागरूकता वाढवण्‍याची गरज आहे, ज्‍यामुळे व्‍यक्‍तींना लवकरात लवकर मदत मिळू शकेल. हे अत्‍यंत महत्त्वाचे आहे, कारण हे विविध आरोग्‍यविषयक आजारांचे लक्षण असू शकते, ज्‍यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होण्‍यासोबत फ्रॅक्‍चर्स किंवा चक्‍कर येऊन पडणे असे गंभीर आजार होऊ शकतात. व्‍यायाम व वैद्यकीय उपचार व्यक्तींना त्‍यांची जीवनशैली सुधारण्‍यास मदत करण्‍यामध्‍ये लाभदायी ठरू शकतात.

अॅबॉट इंडियाचे प्रादेशिक मेडिकल डायरेक्‍टर डॉ पराग शेठ यांनी सांगितले की, "वर्टिगो हा दुर्बल करणारा आजार आहे, ज्‍याचा व्यक्तीच्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो, पण योग्‍य काळजीसह या आजाराचे व्‍यवस्‍थापन करता येते. अॅबॉटमध्‍ये आम्ही वर्टिगोबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि विश्वसनीय उपाय सादर करण्यासाठी कटिबद्ध आहोत. अशा प्रकारे, आम्ही व्यक्तींना त्यांची स्थिती सक्रियपणे व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी वेस्टिब्युलर एक्सरसाइजच्या व्हिडिओ ट्यूटोरियलसह माहितीपूर्ण साहित्य प्रदान करत आहोत. हे त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यास सक्षम बनवू शकते, ज्‍यामुळे ते त्यांचे संतुलन परत मिळवू शकतील आणि पूर्ण, आरोग्‍यदायी जीवन जगू शकतील.

जीवनशैलीविषयक उपाय लक्षणांमध्‍ये सुधारणा करू शकतात, पण सोबतच वर्टिगोने पीडित अनेक व्‍यक्‍ती प्रीस्‍क्राईब केलेल्‍या उपचारांचे पालन करत नाहीत. आजाराची गंभीर तीव्रता कमी करण्‍यासाठी वेळेवर औषधे घेणे आणि डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याचे पालन करणे हे देखील आवश्‍यक आहे. यामुळे व्‍यक्‍तींना वर्टिगो नियंत्रणात ठेवण्‍यास मदत होऊ शकते आणि ते लवकरच बरे होऊ शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com