मुंबई : आपण बऱ्याचदा आठवड्याभराची भाजी व फळांची खरेदी करतो. सालीसकट साफ करून त्याला फ्रीजमध्ये ठेवतो व ऊर्वरीत सालींना आपण टाकून देतो.
हे देखील पहा -
नेहमी पाहण्यात येते की, सारेच फळांचा व भाज्यांचा वापर करताना त्यांच्या साली व टरफले काढून फेकून देतात. परंतु, पाहायला गेले तर साली व टरफल्यांमध्ये भाज्या व फळांपेक्षा जास्त गुणधर्म व पौष्टिक असतात. पण या फेकून दिलेल्या सालींचा आपण योग्यप्रकारे वापर केल्यास अनेक आजारांवर व गरजेच्या वेळी त्यांचा आपल्याला फायदा (Benefits) होईल. भाज्या व फळांच्या सालीचा फायदा कसा होते हे जाणून घेऊया. (Vegetables and fruits peels benefits)
फळांचा व भाज्यांच्या सालीचा असा होईल आरोग्याला फायदा -
१. डाळिंबाच्या साली उन्हात सुकवून पावडर तयार करून ठेवा. पोटदुखी किंवा सतत मुरडा येत असेल तर त्याचे पाण्यासोबत (Water) सेवन केल्यास फायदा होतो.
२. अनेकदा कारले कडू असते म्हणून त्याला आपण घरात आणत नाही परंतु, कारल्याच्या साली पिळून त्यांना मीठ लावून ठेवावे. त्यानंतर त्यांना उन्हात सुकवावे. साली कडक सुकल्यानंतर त्यांना तळून खाल्ल्यास मधुमेहांच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरेल.
३. मूळव्याधीचा त्रास असणाऱ्यांनी सलगम नावाच्या कंदमूळाच्या साली उकडून त्यात बेसन व बटाटा मिसळून कोफ्ते बनवून खाल्ल्यास आराम मिळतो. यामुळे पोटही साफ होते.
४. मटाराच्या सालींवरील पातळ थर उतरवून त्यात बटाट्याचे मिश्रण घालून भाजी बनवून खाल्ल्यास पोट साफ राहते; तसेच त्वचाही तेजस्वी होते. चेहऱ्यावर कधीही मुरमे होत नाहीत.
५. तुरीच्या साली पातळ कापून कांदा, हिरव्या मिरच्या, मीठ व लाल तिखट मिसळून पिठात मळा. या पिठाचे कुरकुरीत पराठे बनवा व चटणीसोबत सर्व्ह करा.
६. कपाटातील मौल्यवान कपडे किड्यांपासून वाचवण्यासाठी लिंबाच्या साली उन्हात सुकवून पॉलिथिन बॅगेत टाकून कपाटात ठेवा. किडीची समस्या आपोआप सुटेल.
७. वेलदोड्याचे दाणे काढल्यानंतर त्याच्या टरफलांची बारीक पावडर बनवा व ती चहाच्या डब्यात ठेवा. चहाला स्वाद व सुगंधही येईल.
८. पालकांचे देठात त्यात मटाराच्या ताज्या साली व कोथिंबीर चिरून टाका व सूप बनवा. यात लिंबू पिळून गरमागरम प्या. अॅनिमिया व गर्भवती महिलांना फायदाच फायदा होईल.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.