Vastu Tips: तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली हवीये, फक्त 'हे' एक काम करा

जर तुम्हाला तुमची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली हवी असेल, जर निरोगी आयुष्य जगायचं असेल, तर पूर्व दिशेशी संबंधित काही वास्तू टिप्स जाणून घ्या.
Vastu Tips
Vastu TipsSaam Tv
Published On

मुंबई: वास्तुशास्त्रात दिशांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. पूर्व दिशेचे स्वामी ब्रह्मा आणि इंद्र वास करतात. तसेच, या दिशेने सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. त्याचबरोबर या दिशेच्या वास्तू दोषामुळे समस्या निर्माण होतात. जर तुम्हाला तुमची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली हवी असेल, जर निरोगी आयुष्य जगायचं असेल, तर पूर्व दिशेशी संबंधित काही वास्तू टिप्स जाणून घ्या.

Vastu Tips
Vastu Tips: ऑफिसमध्ये 'या' गोष्टी तुमच्या डेस्कवर ठेवा; भरपूर प्रगती होईल, पगारही वाढेल

पूर्व दिशा नेहमी रिकामी ठेवावी

🟠वास्तुशास्त्रानुसार, कुटुंब प्रमुखाच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुलांच्या सुखासाठी घराच्या या दिशेला खिडकी आणि प्रवेशद्वार असायला हवे. यासोबतच मुलांनी या दिशेने तोंड करुन अभ्यास करावा. याशिवाय या दिशेला तोरण लावणे शुभ मानले जाते.

🔵वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला अधिक मोकळी जागा ठेवल्याने धन आणि वंश वाढते. तळमजल्यावर बांधलेली घरे, खोल्या, व्हरांड्यातही पूर्वेकडील भाग मोकळा असेल तर घरात राहणार्‍या लोकांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते.

मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असावा

🟠पूर्व दिशेला बनवलेला मुख्य दरवाजाही पूर्व दिशेचा असेल तर शुभ परिणाम प्राप्त होतात. याशिवाय घराच्या पूर्व दिशेला जितकी कमी भिंत असेल तितका फायदा होतो. तसेच, अशा घरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य चांगले राहते.

🔵घराची ही दिशा इतर कोणत्याही प्रकारच्या बांधकामासाठी वापरु नये. ही दिशा जितकी अधिक खुली ठेवली जाईल तितका अधिक फायदा होतो.

(टीप - वरील सर्व उपाय हे सामान्य माहिती आणि मान्यतांवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला नक्की घ्या)

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com