Valentine Day Love Letter: तुझी अन् तुझीच प्रेम वेडी, पण आपल्या प्रेमाला जात, समाजाच्या स्टेट्सची बेडी

Valentines Day Marathi Love Letter: व्हॅलेंटाइन डेनिमित्त आपल्या प्रिय व्यक्तीला लिहा पत्र. फोन, मेसेजपेक्षा पत्रात आपल्या भावाना मांडा. अनेकदा प्रिय व्यक्तीविषयी आपल्या मनात असलेलं प्रेम बोलून दाखवता येत नाही, त्यामुळे पत्रातून आपल्या भावना व्यक्त करा.
Valentines Day Marathi Love Letter:
Valentines Day Marathi Love Letter: saam tv
Published On

प्रिय...

चेतन

हाय, हॅलोपासून सुरू झालेला आपला संवाद आज एका विशिष्ट नात्यापर्यंत पोहोचलाय. आज आपण प्रेमाच्या जहाजात स्वार झालो आहोत, पण हे प्रेमाचं जहाज पवित्र बंधनाच्या किनाऱ्यापर्यंत जाईल का? हा प्रश्न मला नेहमी पडतो. जर गेलं नाही तर काय होईल? याविचाराने मन दाटून येतं. मी अनेक उदाहरणं पाहिली आहेत, ज्यात प्रेम पराभूत झालंय. आपल्याही प्रेमाचं तसेच होईल का?

तमन्नाओ की महफ़िल…..तो हर कोई सजाता है..!

पूरी उसकी होती है……जो तकदीर लेकर आता है..!!

तू बोलतोस ना तेव्हा वेगळीच शक्ती अंगात येत असते. लाख दु:खं आली तरी ते आपण सहज पार करू. पण जेव्हा मी एकटी असते, त्यावेळी वेगवेगळ्या विचाराने चिंता वाढू लागते. तू म्हणाला होतास की आपल्या नात्याबाबत घरी सांग मी घरी बोलले आहे, सगळ्यांना तुझ्या आणि माझ्या प्रेमाविषयी सांगितलं. घरातील एक व्यक्ती सोडता कोणालाच आपलं नातं आवडलं नाहीये.

व्यक्ती कितीही सुधाराला आणि शिकला तरी त्याच्या मनातून जात ही जात का नाही. त्या जातीला अजून हैवानी शक्ती देणारा पैसा, स्टेट्स. मला प्रश्न पडतो की खरंच आपला समाज पुढरालाय का? तुला खरं सांगते मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू मिळाला नाहीस तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेन.

जिंदगी के हर तजुर्बे ने

एक नया सबक सिखाया है,

हमने जब-जब शराफत दिखाई

ज़माने ने तमाशा बनाया है।

घरी आपला विषय घेतल्यापासून घरात भांडणं सुरू झाली आहेत. पप्पा आईला शिवीगाळ करतात. कालपर्यंत ज्या स्त्रीला ते लक्ष्मी म्हणत होते तिलाच ते घाण घाण शिव्या देत आहेत. मी मामा मामीची लाडकी होते, पण जेव्हापासून मी त्यांना आपल्या प्रेमाबाबत सांगितलं त्यांनी माझी बाजू घेणं सोडून दिले आहे. त्यांनी माझ्याशी अबोला घेतलाय.

प्रेमात माणूस जात, पैसा-पाणी, घरदार पाहत नाही. पण लग्न म्हटलं की सगळं पाहिलं जातं. तुला खरं सांगते, माझं तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे. जोपर्यंत आकाशात चंद्र, तारे असतील तोपर्यंत मी तुझ्याशी प्रामाणिक असेन. तुझ्यावरच प्रेम करेन.

ऊंची इमारतों से मकान मेरा घिर गया.!

कुछ लोग मेरे हिस्से का सूरज भी खा गए..!!

तुझीच मी....

जामखेड, आहिल्यानगर

मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीये?

जवळच्या व्यक्तीला काही मनातलं सांगायचंय, पण भीती वाटतेय. तुमच्या भावनेला आम्ही व्यासपीठ देऊ!

प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. आम्ही ते प्रसिद्ध करू!

आई-वडील, नवरा-बायको, मित्र किंवा प्रियजनाला आजच पत्र लिहा...

भावना तुमच्या, व्यासपीठ आमचं...

तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com